Newasa News : आज नेवासे फाटा येथे महाराजस्व समाधान शिबीर! आ. विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Newasa News : महसूल प्रशासन थेट जनतेच्या दारी; शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण होणार.

Newasa News – महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन शनिवार दि. १४ रोजी नेवासे फाटा येथे करण्यात आल्याची माहिती भानसहिवरे मंडलाधिकारी सरिता मुंडे यांनी दिली. नेवासे फाटा (मुकिंदपूर) येथील जी.के. मंगल कार्यालयात होणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया,
अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सुभाष दळवी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांच्यासह मंडळातील सर्व गावांतील, सरपंच, सेवा संस्थेचे अध्यक्ष, सदस्य आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे. महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता,
शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकाली काढणे, या उद्देशाने राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन केले आहे. परिसरातील शेतकरी व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडलाधिकारी सरिता मुंडे तसेच आकाश जोशी, श्वेता काळे, रमेश रिंडे, सोमनाथ गलांडे, गोरक्षनाथ दराडे या ग्राम महसूल अधिकारी यांनी केले आहे.





