Newasa News : जगदगुरू तुकोबाराय निजधाम संस्थेच्यावतीने संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानला 5 लाखांचा निधी सुपूर्त
पंढरपूर येथील श्री जगदगुरू तुकोबाराय निजधाम संस्था या सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थेचे मार्गदर्शक आळंदी येथील वाणीभूषण महंत ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांच्या पुढाकाराने (Newasa News) पाच लाखाची देणगी नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानला धनादेशाद्वारे सुपूर्त करण्यात आली.

Newasa News : पंढरपूर येथील श्री जगदगुरू तुकोबाराय निजधाम संस्था या सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थेचे मार्गदर्शक आळंदी येथील वाणीभूषण महंत ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांच्या पुढाकाराने (Newasa News) पाच लाखाची देणगी नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानला धनादेशाद्वारे सुपूर्त करण्यात आली.
श्री क्षेत्र पंढरपूर येथे ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली)आळंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहामध्ये उरलेली सुमारे ७५ लाख रुपयांची रक्कम गुरुवर्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांनी वेगवेगळ्या देवस्थानांना देणगीच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला होता.
पंढरपूर देवस्थान,आळंदी माऊली संस्थान, आळंदीतील वारकरी शिक्षण संस्था, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्रीक्षेत्र नेवासा या देवस्थानच्या यात समावेश होता. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानमध्ये झालेल्या धनादेश प्रदान कार्यक्रम (Newasa News) प्रसंगी संतभूमी उपासना पारायण सोहळयाचे अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे व विश्वस्त विष्णूपंत ठोसर यांच्या हस्ते वेदांताचार्य ह.भ.प. देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री यांच्याकडे पाच लाखांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.त्यांनी ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या संकल्पननचे कौतुक करत त्यांना धन्यवाद दिले.
यावेळी रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ महाराज आढाव,सचिन महाराज पवार,गणेश महाराज आरगडे,संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर माऊली शिंदे,कैलास जाधव, संतसेवक बदाम महाराज पठाडे,ह.भ.प. राम महाराज खरवंडीकर,सोनू महाराज पांगरे,श्रीधर महाराज अनुभुले, देवराम सोनवणे,आप्पासाहेब माकोणे,शिवाजी आप्पा होन,संतसेवक दामोदर पवार उपस्थित (Newasa News) होते.






