Newasa News : आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्या प्रयत्नाने देवगड तपोभूमी रस्त्याचे भूमिपूजन

नेवासा : नेवासा तालुक्यातील मुरमे येथील प्रवरासंगम रोड ते देवगड तपोभूमी रस्त्याच्या खडीकरण व कॉंक्रिटीकरणाच्या 20 लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर होऊन, देवगड देवस्थानचे प्रमुख ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांच्या शुभहस्ते झाले.
या कार्यातून आमदार लंघे-पाटील यांनी खरी श्रद्धा व निष्ठा कृतीतून दाखवली. ज्यामुळे राजकारणात साधू-संतांचा केवळ दिखाऊ सहभाग करणाऱ्या नेत्यांना अप्रत्यक्ष चपराक दिली. या रस्त्यामुळे देवगडनगरीच्या विकासाला चालना मिळाली असून, राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा निर्माण झाल्या आहेत. यामुळे भाविक व भक्तांमध्ये आमदार लंघे-पाटील यांचे कौतुक होत आहे.
कार्यक्रमाला सरपंच अजय साबळे, राजेंद्र मते, शिवाजीराव मते-पाटील, बाबासाहेब मुरदारे, संदीप साबळे, अर्जुन वरखडे, रमेश गणगे, बबन लंघे, दिलीप दरोडे, प्रवीण लंघे, सार्वजनिक बांधकाम अधिकारी सयाम यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.





