Newasa News : पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांचा नेवासा येथे सर्वधर्मीय व सर्वपक्षीयांच्यावतीने गौरव

नेवासा : नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी गेल्या तीन महिन्यांत उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्यातील जनतेची मने जिंकली. त्यांच्या यशस्वी प्रशिक्षण कालावधीच्या पूर्णतेच्या निमित्ताने नेवासा येथे सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरिकांतर्फे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात खाडे यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक सहकार्यामुळे आणि जनतेच्या पाठबळामुळे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या पवित्र भूमीत केलेले कार्य अविस्मरणीय आहे.
हा गौरव सोहळा नेवासा येथील औदुंबर चौकातील हॉटेल प्रणाम येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष खाडे यांचे वडील अजिनाथ बापू खाडे होते. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त हभप वेदांताचार्य श्री देविदासजी महाराज म्हस्के, बीड येथील हनुमान गडाचे अभिमन्यू महाराज खाडे, मौलाना जुनायत, ख्रिश्चन धर्मगुरू रेव्हरंट अमोल शिरसाठ, शीख धर्माचे सेवक बंडू सचदे, युवा नेते सुनीलबापू लंघे पाटील आणि गौरव सोहळ्याचे प्रेरक संजय सुखदान उपस्थित होते.
नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर जयदीप जामदार यांनी प्रास्ताविक केले. सर्वधर्मीय धर्मगुरूंचा सन्मान केल्यानंतर उपअधीक्षक संतोष खाडे यांना सर्व धर्मगुरूंच्या हस्ते गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संजय सुखदान यांनी खाकी वर्दीचे कापड भेट देत खाडे यांना अहमदनगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होताना हा वस्त्र परिधान करण्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी हभप देविदासजी महाराज, इंजिनियर सुनीलराव वाघ, ज्येष्ठ कार्यकर्ते गफूरभाई बागवान, ज्येष्ठ पत्रकार अशोकराव डहाळे, यशवंत स्टडी क्लबचे महेश मापारी, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य निरंजन डहाळे, भाजप शहराध्यक्ष मनोजभाऊ पारखे, माऊली तोडमल, हभप खाडे महाराज आणि सुनीलबापू लंघे यांनी खाडे यांच्या कार्याचा गौरव करणारी मनोगते व्यक्त केली. स्वप्नील मापारी यांनी आभार मानले.
या सोहळ्याला आदर्श शिक्षिका शालिनीताई गायकवाड, शिव सहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार, ज्येष्ठ पत्रकार सुखदेव फुलारी, माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, माजी पुरवठा अधिकारी राजेंद्र वाघ, मास्टर सुरेश लव्हाटे, राजेश कडू, ज्ञान फाऊंडेशनचे प्रा. देविदास साळुंके, सागर गंधारे, महेश देवढे, योगेश रासने, अब्बास बागवान, हारून जहागीरदार, सुलेमान मणियार, संभाजी ठाणगे, राजू काशीद, बालू फसले, अजय त्रिभुवन, सचिन गटण्या पवार, हॉटेल प्रणामचे चालक रंजनदादा जाधव, बंटी जाधव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





