#ICCWorldCup2019 : आजही गांभीर्यानेच खेळणार-विल्यमसन
Updated On:

नॉटिंगहॅम – कर्णधार केन विल्यमसन याने आतापर्यंत संघाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे. लागोपाठ तीन सामने त्याच्या संघाने जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भारताविरूध्द त्यांचेच पारडे जड राहिले आहे, अस असले तरी आजच्या सामन्यात आम्ही गांभीर्यानेच खेळणार अशी प्रतिक्रिया केन विल्यमसन याने सामन्याआधी दिली आहे.
पुढे बोलताना तो म्हणाला की, आतापर्यत आम्ही येथे तीनही सामने जिंकले असले तरीही भारतावर मात करणे हे आव्हान आहे. साहजिकच क्षमतेच्या शंभर टक्के कौशल्य दाखवित खेळले पाहिजे असा सल्ला मी माझ्या सहकाऱ्यांना दिला आहे.
धवन हा खेळत नसला तरी भारताकडे शेवटच्या फळीपर्यंत फलंदाजी आम्हाला आहे. त्यामुळेच आजही आम्ही गांभीर्यान खेळणार आहोत असे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने सांगितले.





