Ind vs Nz 2nd Test : घरच्या मैदानावर टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव; 0-2 ने सीरीज न्यूझीलंडच्या खिशात

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळवण्यात आला. बंगळुरू कसोटीनंतर टीम इंडियाला पुणे कसोटीतही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. 18 मालिकेनंतर घरच्या मैदानावर टीम इंडिया कसोटी मालिका हारली आहे. या विजयाबरोबर न्यूझीलंडने मालिकादेखील खिशात घातली आहे.
New Zealand take an unassailable 2-0 lead as India lose their first Test series at home since 2012.#WTC25 | #INDvNZ 📝: https://t.co/Kl7qRDguyN pic.twitter.com/ASXLeqArG7
— ICC (@ICC) October 26, 2024
या मालिकेत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्या इंनिगमध्ये 259 धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेली टीम इंडिया अवघ्या 156 धावांत गारद झाली. यानंतर न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावात 255 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य देण्यात आले.
मात्र दुसऱ्या इंनिगमध्ये यशस्वी जैस्वाल वगळता एकही फलंदाज या डावात जास्त काळ टिकू शकला नाही, त्यामुळे भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. यापूर्वी 2012-13 च्या भारत दौऱ्यात इंग्लंडने टीम इंडियाचा कसोटी मालिकेत पराभव केला होता. तेव्हापासून भारतीय संघाचे घरच्या मैदानावर वर्चस्व होते. त्याने सलग 18 मालिका जिंकल्या होत्या, मात्र आता विजयी मालिकेला ब्रेक लागला आहे.





