नववर्षाच्या आगमनाला शहरातील हॉटेल्स पहाटे 5 पर्यंत राहणार सुरू
Updated On:

पुणे – नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यपान मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यासाठी मंगळवारी (दि. 31) रात्री हॉटेल पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच, पार्ट्यांमध्ये मद्य पुरविण्यासाठी एक दिवसीय परवाने देण्यात आले आहेत.
मद्यालयातून विक्री होणारे तसेच पार्टीत पुरवले जाणाऱ्या मद्यातील भेसळ रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे 14 पथके लक्ष ठेवणार आहे. मद्य पिण्याचा परवाना घ्या, विनापरवाना देशी-विदेशी मद्य पिणे, खरेदी करणे आणि जवळ बाळगणाऱ्यावरही कारवाई केली जाणार आहे. ही संभाव्य कारवाई टाळण्यासाठी ज्या ठिकाणांवरून मद्य खरेदी करत आहात, त्याच ठिकाणी एक दिवसाचा मद्य पिण्याचा व बाळगण्याचे अडीच लाखापेक्षा परवाने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे मद्य खरेदी करताना परवाना घ्या, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी केले आहे.





