नेपाळबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भागीदारीचा नवा करार

नवी दिल्ली : भारत आणि नेपाळ यांच्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करणारा अतिशय महत्त्वाचा ठरणारा एक करार करण्यात आला आहे. भारताची वैज्ञानिक संशोधन परिषद आणि नेपाळ अकॅडमी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थांदरम्यान मंगळवारी नवी दिल्लीत सीएसआयआर-नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी येथे हा करार करण्यात आला.
सीएसआयआरचे संचालक आणि डीएसआयआरचे सचिव डॉ. एन. कलाईसेल्वी आणि एनएएसटीचे कुलगुरु प्राध्यापक डॉ. दिलिप सुब्बा यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि संबंधित कागदपत्रांची देवाणघेवाण केली. या करारामुळे द्विपक्षीय वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानविषयक सहकार्याला चालना देण्यासाठी एक व्यापक चौकट स्थापित झाली आहे.
भारताची सीएसआयआर आणि नेपाळची एनएएसटी यांच्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक सहकार्याच्या सामंजस्य कराराच्या प्रतींची सीएसआयआरचे संचालक डॉ. एन. कलाईसेल्वी आणि एनएएसटीचे कुलगुरु प्राध्यापक डॉ. दिलिप सुब्बा यांनी परस्परांमध्ये देवाणघेवाण केली.
या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन कृती कार्यक्रमांवर १९९७ आणि २००२ साली स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कराराच्या अधिकृत कालावधीनंतरही अनेक संयुक्त कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नव्या सामंजस्य करारामुळे या सहकार्याचे पुनरुज्जीवन होणार असून दोन्ही संस्थांदरम्यान वैज्ञानिक देवाणघेवाण वृद्धिंगत होणार आहे.

