टू-व्हिलरवर मागे बसणाऱ्यांसाठी सरकारची नवी नियमावली

नवी दिल्ली – टू-व्हिलर वारकर्त्यांसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून नवीन गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. या नवीन गाइडलाइन्सनुसार टू-व्हिलरच्या मागील सीटवर बसणाऱ्यांसाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. देशभरात रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात जीवीत हाणी होते. यावर आळा घालण्यासाठी सरकारकडून काही उपाययोजना आखल्या जात आहेत.
काय असणार नवीन गाइडलाइन्स
बाईकच्या मागील सीटच्या दोन्ही बाजूला हँड होल्ड आवश्यक
बाईकला लहानसा कंटेनर लावण्याचेही निर्देश जारी, या कंटेनरची लांबी 550 मिमी, रुंदी 510 मिली आणि उंची 500 मिमीहून अधिक नसावी.
3.5 टन वजनापर्यंतच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमचा सल्ला
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून वेळोवेळी रस्ते सुरक्षा नियमांत बदल करण्यात येतात. मागील काही वर्षात रस्ते सुरक्षा नियम कठोर करण्याबाबत जोर देण्यात आला आहे.





