नव्या पोपकडून युक्रेन आणि गाझामध्ये शांततेचे आवाहन

व्हॅटिकन सिटी : पोप लिओ चौदावे यांनी रविवारी दुपारी त्यांच्या पहिल्या आशीर्वादसभेमध्ये युक्रेनमध्ये खऱ्या आणि न्याय्य शांततेचे आणि गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीचे आवाहन केले. ध्रुवीकरण झालेल्या कॅथोलिक चर्चमध्ये एकतेचा हा प्रतीकात्मक संदेश होता. जगभरातल्या मोठ्या शक्तींना मी पुन्हा एकदा युद्ध नको, याच मागणीचे आवाहन करत आहे, असे पोप लिओ यांनी सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या गॅलरीतून उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना सांगितले. या प्रसंगी किमान एक लाख भाविक पोप लिओ यांचे शुभाशिर्वाद ऐकण्यासाठी उपस्थित होते.
पोप म्हणून निवड झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी जगासमोर पहिल्यांदा आल्यानंतर पोप लिओ यांनी शांतीचा संदेश देखील दिला. अमेरिकेतून पहिला पोप म्हणून निवड झाल्यानंतर लिओ पहिल्यांदाच लॉगियामध्ये परतले होते. त्यांनी रेजिना केली प्रार्थना गायन करून एक नाविन्य आणले, ही प्रार्थना ईस्टर हंगामात केली जाणारी लॅटिन प्रार्थना होती अलीकडील पोप या प्रार्थनेचे केवळ पठण करायचे. या प्रार्थनेचे गायन केले जात नसायचे. त्यांच्या पूर्वीच्या पोपकडून अपोस्टोलिक पॅलेसच्या स्टुडिओ खिडकीतून पियाझाच्या बाजूने जनतेला अभिवादन केले जात असायचे. , मात्र लिओ चौकाच्या अगदी मध्यभागी आणि चर्चच्या मध्यभागी गेले होते. ही त्यांनी एक नवीन प्रथा सुरू केली.
पोप लिओ यांनी युद्धकैद्यांची सुटका आणि युक्रेनमधील मुलां त्यांच्या कुटुंबियांकडे परत करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे स्वागत केले. त्यांनी गाझामध्ये तात्काळ युद्धबंदी करण्याचे आणि विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी मानवतावादी मदत पुरवण्याचे आणि सर्व ओलिसांची सुटका करण्याचे आवाहन केले. आजचा रविवार हा अनेक देशांमध्ये मातृदिन म्हणून साजरा केला जात होता आणि म्हणून पोप लिओ यांनी स्वर्गातील मातांसह सर्व मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या.





