Mahayuti ministers bungalows: महायुतीच्या नव्या मंत्र्यांना मिळाल्या मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता बंगला मिळाला पहा

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचे बहुप्रतिक्षित खातेवाटप शनिवारी 21 डिसेंबर ला जाहीर करण्यात आले. मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर आता मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठ सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले आहे.
कोणत्या मंत्र्यांस कोणता बंगला –
महायुतीच्या 31 मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. विधान परिषद सभापती राम शिंदे यांना निवासस्थान ज्ञानेश्वरी, विधानसभा अध्यक्ष राहुल नावेकर यांना शिवगिरी, चंद्रशेखर बावनकुळे – रामटेक, राधाकृष्ण विखे-पाटील – रॉयलस्टोन, हसन मुश्रीफ (क-८) – विशाळगड, चंद्रकांतदादा पाटील ब-१ – सिहगड, गिरीश महाजन – सेवासदन, गुलाबराव पाटील – जेतवन, गणेश नाईक ब-४ – पावनगड , दादा भुसे ब-३ – जंजीरा, संजय राठोड – शिवनेरी, धनंजय मुंडे – सातपुडा, मंगलप्रभात लोढा ब-५ – विजयदुर्ग, उदय सामंत – मुक्तागिरी, जयकुमार रावल – चित्रकूट, पंकजा मुंडे – पर्णकुटी, अतुल सावे अ-३ – शिवगढ़, अशोक उईके अ-९ – लोहगड, शंभूराजे देसाई – मेघदूत, आशिष शेलार व-२ – रत्नसिषु, दत्तात्रय भरणे ब-६ – सिध्दगड, अदिती तटकरे अ-५ – प्रतापगड, शिवेंद्रराजे भोसले ३-७ – पन्हाळगड, माणिकराव कोकाटे अंबर-२७, जयकुमार गोरे क-६ प्रचितीगड, नरहरि झिरवाळ सुरुचि ०९, संजय सावकारे अंबर-३२, संजय शिरसाठ अंबर-३८, प्रताप सरनाईक अर्वतो-५, भरत गोगावले सुरुचि ०२, मकरंद पाटील सुरुचि-०३ असे निवास्थान मिळाले आहे.
कोणाला कोणते खाते मिळाले, संपूर्ण यादी-
कॅबिनेटमंत्री-
– देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी
– एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण
– अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन
– चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
– राधाकृष्ण विखे- पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
– हसन मुश्रीफ – मेडिकल एज्युकेशन
– चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
– गिरीश महाजन – जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
– गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा आणि स्वच्छता
– गणेश नाईक – वनमंत्री
– दादाजी भुसे – शालेय शिक्षण
– संजय राठोड – जलसंधारण
– धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा
– मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास
– उदय सामंत – उद्योग आणि मराठी भाषा
– जयकुमार रावल – मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
– पंकजा मुंडे – पर्यावरण आणि हवामान बदल, ॲनिमल हसबंडरी
– अतुल सावे – ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी
– अशोक ऊईके – आदिवासी विकास
– शंभुराज देसाई – पर्यटन, खनिकर्म
– अॅड.आशिष शेलार – सांस्कृतिक कार्य आणि आयटी
– दत्तात्रय भरणे – क्रिडा आणि अल्पसंख्याक विकास
– आदिती तटकरे – महिला व बालविकास
– शिवेंद्रसिंह भोसले – सार्वजनिक बांधकाम
– अॅड.माणिकराव कोकाटे – कृषी
– जयकुमार गोरे – ग्रामविकास
– नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
– संजय सावकारे – टेक्सटाईल
– संजय शिरसाट – सामाजिक न्याय
– प्रताप सरनाईक – परिवहन
– भरतशेठ गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन आणि मिठागर जमीन विकास
– मकरंद जाधव पाटील – मदत आणि पुनर्वसन
– नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
– आकाश फुंडकर – कामगार
– बाबासाहेब पाटील – सहकार
– प्रकाश आबीटकर – आरोग्यमंत्री
राज्यमंत्री-
– माधुरी मिसाळ – नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, मेडिकल एज्युकेशन, अल्पसंख्याक विकास
– आशिष जयस्वाल – अर्थ, कृषी, मदत व पुनर्वसन, कायदा आणि न्यायालये, कामगार
– पंकज भोयर – गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म
– मेघना बोर्डीकर – साकोरे – आरोग्य, पाणीपुरवठा, ऊर्जा, महिला व बालविकास
– इंद्रनील नाईक – उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन आणि माती व जलसंधारण
– योगेश कदम – गृह (शहरी), महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन





