न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा! आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून हितेश मेहताची पॉलीग्राफ चाचणी

New India Co-operative Bank scam । मुंबईतील १२२ कोटी रुपयांच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हितेश मेहता यांची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. मुंबई पोलिसांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे यात त्यांनी ही माहिती दिली.
चाचणी सुमारे २ तास ३० मिनिटे चालली New India Co-operative Bank scam ।
मुंबई पोलिसांनी दिलेल्या निवेदनात, “ही चाचणी एफएसएल म्हणजेच फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये फॉरेन्सिक तज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांच्या उपस्थितीत करण्यात आली. ही चाचणी सुमारे २ तास ३० मिनिटे चालली” असे म्हटले आहे. या काळात, घोटाळ्याशी संबंधित सुमारे ४० ते ५० प्रश्न मेहता यांना विचारण्यात आले, ज्यांचे उत्तर त्यांनी (हितेश मेहता) हो आणि नाही असे दिले.
मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, काल सकाळी ११ ते दुपारी १:३० वाजेपर्यंत ही चाचणी चालली आणि त्यात पैशांचे हस्तांतरण, इतर आरोपींची भूमिका आणि बँक निधीचा गैरवापर यासारख्या महत्त्वाच्या बाबींशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) अधिकाऱ्यांनी सांगितले की, पॉलीग्राफ चाचणीचा अहवाल ३ ते ४ दिवसांत येण्याची अपेक्षा आहे. या अहवालाच्या आधारे अनेक पैलूंवर स्पष्टता येण्याची शक्यता असल्याचा दावा पोलिसांनी केला.
बँकेच्या कार्यकारी अध्यक्षा पतीसह देश सोडून पळाले New India Co-operative Bank scam ।
यापूर्वी, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) या महिन्याच्या सुरुवातीला माहिती दिली होती की न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कार्यकारी अध्यक्षा गौरी भानू आणि त्यांचे पती हिरेन भानू देश सोडून पळून गेले आहेत. मुंबई पोलिस लवकरच त्याला फरार घोषित करतील. हिरेन भानू २६ जानेवारी रोजी देश सोडून दुसऱ्या देशात गेला होता, तर त्याची पत्नी गौरी भानू १० फेब्रुवारी रोजी थायलंडला पळून गेली होती. आरबीआयच्या तपासणीच्या सुमारे दोन आठवडे आधी हिरेन भानू पळून गेला.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या १२२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी एकूण चार आरोपींना अटक केली होती, ज्यात बँकेचे माजी जीएम हितेश मेहता, बिल्डर धर्मेश पौण आणि अभिमन्यू यांचा समावेश होता. १२२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मनोहरची ही चौथी अटक आहे.
हेही वाचा
जम्मू-काश्मीरमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळले ; ४ जणांचा मृत्यू , १० जण गंभीर जखमी





