न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना अखेर दिलासा; RBIने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

New India Co-operative Bank | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. काही दिवसांपूर्वी न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले होते. त्यानुसार खातेधारकांना आपल्या खात्यातील पैसेही काढता येत नव्हते, त्यामुळे खातेदारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. परंतु एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ही बंदी हटवण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेने एक्सवर पोस्ट करून याबद्दल माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेसाठी प्रशासक आणि सल्लागारांची समिती नियुक्त केली होती. त्यांच्यासोबत बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर रिझर्व्ह बँकेने खातेधारकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
25 हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी
आरबीआयने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना 27 फेब्रुवारी 2025 पासून प्रती ठेवीदार 25 हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. ठेवीदार हे बँकेच्या शाखेत किंवा एटीएमचा वापर करुन 25 रुपयांपर्यंतचे पैसे काढू शकणार आहेत. त्यामुळे बँकेच्या ठेवीदारांसाठी हा मोठा दिलासा आहे. New India Co-operative Bank |
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या सवलतीनंतर बँकेच्या एकूण खातेधारकांपैकी सुमारे 50 टक्के म्हणजेच निम्मे खातेदार त्यांचे संपूर्ण शिल्लक पैसे काढू शकतील. उर्वरित अर्धे खातेधारक त्यांच्या खात्यातून 25 हजारांपर्यंत पैसे काढू शकतील. हे पैसे काढण्यासाठी, खातेदार बँकेच्या शाखेत जाऊ शकतात किंवा बँकेच्या एटीएमचा वापर करू शकतात. New India Co-operative Bank |
आतापर्यंत कोणाला केली अटक?
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता याला अटक केली आहे. हितेश मेहताने बँकेच्या दादर आणि गोरेगाव येथील शाखेतून तब्बल 122 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी हर्षल मेहता याच्यासोबत धर्मेश पान आणि अभिमन्या भोन यांनाहीअटक केली आहे. या तिघांना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा :
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा; म्हणाले “माझ्यावर दबाव होता…”



