‘तुबांड’च्या दिग्दर्शकाचा नवीन चित्रपट; पोस्टरनंतर व्हिडीओ समोर, ‘मयसभा’त मराठी अभिनेत्रीला मिळाली मोठी संधी

Rahi Anil Barve : गेल्या काही दिवसांपूर्वीच तुबांड चित्रपटाचा दिग्दर्शक राही अनिल बर्वे याने त्याच्या आगामी मयसभा चित्रपटाची घोषणा केली होती. सोशल मीडियावर या चित्रपटाचे पहिले पोस्टरही राहीने शेअर केले होते. पोस्टर पाहिल्यानंतर मयसभा चित्रपटाची मोठी उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. अशातच आता या चित्रपटाचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओने देखील चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
राहीने शेअर केलेल्या मयसभाच्या पोस्टरमध्ये अभिनेता जावेद जाफरीचा ओळखू न शकणारा खतरनाक लूक शेअर करण्यात आला होता. यानंतर आता समोर आलेल्या व्हिडीओतून मराठी अभिनेत्री देखील चित्रपटात झळकणार आहे. या अभिनेत्रीचे नाव वीणा जामकर असून, तिने अनेक मराठी चित्रपटात छोट्या पण लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारलेल्या आहेत. या चित्रपटामुळे तिला मोठी संधी मिळाली आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावरील व्हिडीओत बॅकग्राऊंडला धडकी भरवणारा एक भयानक आवाज ऐकू येत आहे. या व्हिडीओसोबत राहीने चित्रपटाची रिलीज डेट आणि कलाकारांची माहिती सांगितली आहे. ”मैं रौंदूंगी तोहे… मैं रौंदूंगी तोहे” असा भारदस्त आवाज ऐकू येतो. त्यानंतर पुढे चित्रपटाचे टायटल समोर येतात. हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुंबाडनंतर मयसभा हा राहीचा दुसरा चित्रपट आहे. यामुळे या चित्रपटात नेमकं काय दाखविण्यात येणार याविषयी मोठी उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे.
हेही वाचा : रुग्णांची चिंता कमी करण्यासाठी संगीत महत्वाचे; संशोधनातून माहिती समोर





