Audio-Video Call : उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्वीटरचे सूत्र हाती घेतल्यापासून अनेक बदल केले आहेत. सुरुवातीलाच त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरून त्याचे नाव बदलून एक्स केले आहे. त्यानंतर ते यात सतत बदल करत यूजरल नवे फीचर देण्याचा प्रयत्न करत आहे. यातच आता इंस्टाग्राम आणि फेसबुक टक्कर देत मस्क यांनी नव फीचर उपलब्ध करून दिले आहे.
इंस्टाग्राम आणि फेसबुक प्रमाणे तुम्हाला आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करता येणार आहे. एलॉन मस्क यांनी ही माहिती दिली आहे. हे फीचर कुठे काम करू शकेल हे त्यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी ट्विटरने सांगितले होते की, ते ऑडिओ व्हिडिओ कॉल फीचरवर काम करत आहे. हे फीचर आल्यानंतर तुम्ही WhatsApp, Instagram आणि Facebook प्रमाणे Twitter वरून ऑडिओ व्हिडिओ कॉल देखील करू शकता.
या फीचरची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर या युजर्संची ही प्रतिक्षा संपली आहे. ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फीचरची X वर अनेक महिन्यांपासून चाचणी केली जात होती आणि आता ते Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले जात आहे. सध्या ट्विटरवर ऑडिओ व्हिडिओ कॉलचा पर्याय फक्त प्राइम सदस्यांसाठी आहे. मात्र प्रत्येकाला कॉल रिसिव्ह करण्याची सुविधा असेल.
ऑडिओ-व्हिडिओ कॉल फिचरचा अस करा वापर
- सर्व प्रथम X च्या सेटिंग्ज पर्यायावर जा.
- आता तुम्हाला Privacy and Safety या पर्यायावर जावे लागेल.
- आता तुम्हाला येथे डायरेक्ट मेसेजचा पर्याय मिळेल.
- तुम्हाला डायरेक्ट मेसेजवर ऑडिओ व्हिडिओ कॉलचा पर्याय मिळेल, तो सक्षम करा.
तुम्हाला कोण कॉल करू शकेल?
नवीन फीचर फक्त प्रीमियम सब्सक्राइबर्ससाठी आहे. फक्त ब्लू टिक वापरकर्ते ऑडिओ-व्हिडिओ कॉल करू शकतात. मात्र, प्रत्येकाला कॉल रिसिव्ह करण्याची सुविधा असेल. त्याच वेळी, जर तुम्हाला प्रत्येकाने तुम्हाला कॉल करू नये असे वाटत असेल तर कंपनीने यासाठी तीन पर्याय दिले आहेत. पहिले म्हणजे तुमच्या अॅड्रेस बुकमध्ये जोडलेले लोक, दुसरे- ज्यांचे तुम्ही फॉलो करता आणि तिसरे- वेरिफाइड वापरकर्ते. दरम्यान, X च्या या नवीन फीचरचा युजर्संना नक्की फायदा होऊ शकतो.