‘नो एन्ट्री’च्या सिक्वेलमध्ये दिसणार नवे चेहरे; जुन्या कलाकारांनी काम करण्यास दिला नकार

No Entry 2 Film | बॉलिवूडमधील ‘नो एंट्री 2’ हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. 2005 साली आलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा झाली. मात्र नो एन्ट्री-2 मध्ये सलमान खान, बिपाशा बासु आणि अनिल कपूर दिसणार नाही. त्यामुळे आता नो एन्ट्री-2 मध्ये संपूर्ण कास्टिंगनवी असणार आहे.
‘नो एंट्री’मध्ये सलमान खान, अनिल कपूर, फरदीन खान, लारा दत्ता, ईशा देओल, बिपाशा बसू आणि सेलिना जेटली सारखे कलाकार होते. मात्र या सिक्वलमध्ये दिलजीत दोसांझ, वरुण धवन आणि अर्जुन कपूर दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र यात अभिनेत्री कोण असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
बोनी कपूर यांनी सीक्वलमध्ये मूळ कास्ट का ठेवला नाही हे स्पष्ट केले आहे. बोनी कपूर यांनी सांगितल्यानुसार, ‘नो एन्ट्री-2 या चित्रपटात जुनेच कलाकार असावे यासाठी खूप प्रयत्न केला. खूप वेळ वाटही पाहिली. पण नो एन्ट्री-1 या चित्रपटात भूमिका साकारलेल्या अनेक कलाकारांनी हा याच्या सिक्वेलमध्ये काम करण्यास नकार दिलेला आहे. प्रत्येकाने वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. त्यांनी दिलेल्या कारणांचा मला आदरच आहे. त्यामुळे आता ‘नो एन्ट्री-2’ या चित्रपटात नवे चेहरे दिसतील. No Entry 2 Film |
नो एन्ट्री-2 हा चित्रपट 2025 साली दिवाळीत रिलिज केला जाणार आहे. त्यासाठीची तयारी देखील चालू करण्यात आली आहे. या चित्रपटासाठी कथा तयार असून पुढील प्रक्रियेला वेग आलेला आहे. हा मूळ चित्रपटापेक्षा चांगला असेल, असा दावाही बोनी कपूर यांनी केली आहे.
26 ऑक्टोबर 2025 पर्यंत म्हणजेच दिवाळीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे आमचे टार्गेट असेल, असे सांगितले. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर पोस्ट प्रोडक्शनमध्येही बरेच काम असते. त्यामुळे हे सगळे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे बोनी कपूर यांनी सांगितले. No Entry 2 Film |
दरम्यान, ‘नो एंट्री’ 2005 साली रिलीज झाला होता आणि अनीस बज्मीने दिग्दर्शित केला होता. ‘नो एंट्री’ हा 2005 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.
हेही वाचा :
विजय आणि रश्मिका विमानतळावर झाले स्पॉट; न्यू ईयर सेलिब्रेशन करणार एकत्र?





