Delhi-NCR Rain: दिल्लीत मुसळधार पाऊस, वाहतूक कोंडी… IMDकडून यलो अलर्ट जारी
Updated On:

Delhi Rain Update- दिल्ली एनसीआरमध्ये संध्याकाळी उशिरा मुसळधार पाऊस झाला. नोएडा, गाझियाबाद, फरीदाबाद आणि गुरुग्रामसह राष्ट्रीय राजधानी आणि आसपासच्या शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. मुसळधार पावसामुळे पाणी साचणे, वाहतूक कोंडीची समस्या निर्णाण झाली. त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे.
पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी –
बुधवारपासून पुढील तीन दिवस दिल्लीत चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे बुधवारी ऑरेंज अलर्ट तर पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMDने दिल्ली परिसरात पावसाचा अंदाज वर्तवला होता.





