नेवासा: चोरीस गेलेले टाळ २४ तासांत जप्त, एकादशीला भजनी मंडळास परत
Updated On:

नेवासा : नेवासा तालुक्यातील रांजणगाव (देवी) येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाचे २२,४०० रुपये किंमतीचे २८ पितळी टाळ चोरीस गेल्याच्या घटनेनंतर नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी अवघ्या २४ तासांत तपास करून टाळ जप्त केले. एकादशीच्या शुभमुहूर्तावर हे टाळ भजनी मंडळास परत करण्यात आले.
रांजणगाव (देवी) येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाचे २८ पितळी टाळ चोरीस गेल्याची फिर्याद अशोक बाबासाहेब चौधरी (वय ६०) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात नोंदवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शेवगाव येथे छापा टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेले सर्व टाळ जप्त करण्यात आले. एकादशीच्या शुभदिनी पोलिसांनी हे टाळ भजनी मंडळास सुपूर्द केले.





