नेवासा: शेतजमीन वाटपावरून कडाक्याचे भांडण: बापाने केला मुलाचा खून, गोधेगावातील घटना

नेवासा – शेती वाटपाच्या कारणावरून होणाऱ्या भांडण-तंट्याच्या त्रासाला कंटाळून बापाने मुलाच्या डोक्यात फळी मारुन खून केल्याची धक्कादायक घटना गोधेगांव (ता.नेवासा) येथे घडली आहे. याबाबत मृत मुलाच्या आईने नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीसांनी बापाला ताब्यात घेवून बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, गोधेगांव येथील शेती वाटपाच्या कारणावरुन मुलगा शिवाजी दादासाहेब जाधव आणि बाप दादासाहेब सारंगधर जाधव यांच्यामध्ये शेती वाटपाच्या कारणावरुन मंगळवार (दि.१४) रोजी कडाक्याचे भांडणे झाले. यावेळी बाप दादासाहेब जाधव याने मुलगा शिवाजी जाधव याला फळीने मारहाण केली. या झालेल्या मारहाणीत मुलगा शिवाजी जाधव हा मयत झाला.
याप्रकरणी मुलाची आई अलका दादासाहेब जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात जन्मदात्या बापावर मुलाचा खुन केल्याप्रकरणी भादवी कलम ३०२ अन्वये खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.





