४८ लाख रुपये खर्चाची वृक्ष लागवड केवळ नावापुरती
नेवासा – नेवासा नगरपंचायतीमध्ये झालेल्या वृक्ष लागवड घोटाळा प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे फेर चौकशीची मागणी करण्यात आली.
याबाबत अधिक महिती अशी कि, नेवासा नगरपंचायतीकडून चौदाव्या वित्त आयोगामधून नेवासा शहरात ४८ लाख रुपये खर्चाची सुमारे अठराशे वृक्ष लागवडीची निविदा काढण्यात आलेली होती. सदरचे टेंडर हे ड्रॅगनफ्लाय नर्सरी (प्रो.प्रा.ऋतुराज जोशी) यांना देण्यात आलेले होते तर प्रत्यक्षात मात्र राजकीय हस्तक्षेपातून शहरातील काही जणांनी हे टेंडर स्वतःकडे घेऊन लागवड करण्याचा केवळ बहाणा केला. वृक्ष लागवडीनंतर एक वर्ष जोपासना करून सदर वृक्ष नगरपंचायतकडे सुपूर्द करणे असे नमूद करण्यात आलेले होते. परंतु, निविदेत नमूद वृक्ष लागवड करण्यात आलेलीच नाही. उलट एक वर्षाच्यानंतर अठराशे वृक्ष हस्तातरण सुद्धा करण्यात आलेले नाही.
नगरपंचायतीने याबाबत कोणतीही शहानिशा न करता सुमारे अठ्ठावीस लाख रुपयाची बिले ठेकेदारास अदा करण्यात आली सध्या शहरात अठराशे सोडा दहा वृक्ष देखील लावलेले आढळून येत नाही नेवासा काँग्रेसने या सर्व प्रकरणाची दाखल घेत आक्रमक भूमिका घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. सादर प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती सदर प्रकरणात चौकशी झाली सुनावणी देखील झाल्या प्रकरण तालुक्यात गाजले देखील परंतु प्रशासनाने प्रशासनाला पाठीशी घालत क्लीन चिट देत मुख्याधिकारी यांना दिलासा दिला.
त्यामुळे सदर प्रकरण गुलदस्त्यात टाकण्यात आले गुरुवार (दि.१६) रोजी तक्रारदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे,काँग्रेस शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत सदर प्रकरणाची फेर चौकशीची मागणी केली यावेळी जिल्हाधिकारी यांना चौकशीचे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने फेर चौकशी करण्यात येईल असे स्पष्ट केलेवेळी हरीश चक्रनारायण,कैलास बोर्डे,इलीयास शेख आदी उपस्थित होते.
वृक्ष लागवड घोटाळ्याचा पर्दाफास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही यामध्ये कितीही हस्तक्षेप केला तरी संबंधित दोषी अधिकारी,ठेकेदार यांच्याकडून काढलेल्या रकमेची वसुली करणे गरजेचे आहे. शहराचे वाट लावणाऱ्यांना येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत जनता जागा दाखवून देईल
संभाजी माळवदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी