नेवासा: विना अपघात सेवा देणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

नेवासा – विना अपघात सेवा देणाऱ्या नेवासा डेपोतील एस.टी. कर्मचाऱ्यांचा सेवापूर्तीच्या निमित्ताने सन्मानचिह देऊन सत्कार करण्यात आला. नेवासा डेपोच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी झालेल्या सेवापूर्ती गौरव सोहळयाच्या अध्यक्षस्थानी आगारव्यवस्थापक रामनाथ मगर हे होते. तर प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष अनिलराव ताके पाटील, प्रवाशी संघटनेचे सचिव पत्रकार सुधीर चव्हाण, अकाउंटंट मोहन मोरे, सेवानिवृत्त झालेले सत्कारमूर्ती वाहतूक नियंत्रक वेणूनाथ मदने, वाहक मुरलीधर हवाले, चालक राजेंद्र आव्हाड, गोरक्षनाथ आव्हाड, रामदास आव्हाड, खलीलखान पठाण, बस स्थानक प्रमुख अविनाश मुरदारे, कैलास महाराज दहिफळे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी एस. टी .डेपोचे वरिष्ठ सहायक वासुदेव आव्हाड यांनी आलेल्या अतिथी मान्यवराचे स्वागत करून प्रास्ताविक केले. डेपोची वाटचाल व कर्मचाऱ्यांचे योगदान याबद्दल माहिती देत त्यांनी सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा लेखाजोखा सादर केला. यावेळी सेवानिवृत्त झालेले वाहतूक नियंत्रक चालक – वाहक यांचा एस टी महामंडळाची ट्रॉफी व पाचीपोशाख देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष अनिलराव ताके पाटील म्हणाले की, सेवापूर्ती झालेल्या एस टी च्या कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक करून नेवासा डेपोच्या उत्कर्षासाठी मोठे योगदान दिले आहे. येथील पुढील कालावधी त्यांनी सामाजिक व आध्यात्मिक सेवेत घालविण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन करून दीर्घायुष्य जीवनासाठी व चांगल्या आरोग्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
आगारव्यवस्थापक रामनाथ मगर म्हणाले की, एस टी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे व कष्टामुळे आज नेवासा डेपो नफ्यात असल्याचे सांगून घरची परिस्थिती कडे ध्यान देता आपल्या कुटुंबातील मुलांचे शिक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून कुटुंबाला सुस्थितीत आणण्याचे काम सर्व कर्मचाऱ्यांनी केले असल्याचे सांगून त्यांनी त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी एस टी महामंडळाचे राकेश सोनवणे, बबनराव ओनावळे, कामगार नेते अनिल टाके, रमेश दाणे, ज्ञानदेव आगळे, विकास पाटोळे, काकासाहेब पोटे, गणेश फुलकर, कैलास म्हस्के, योगेश पंडित, प्रसाद परदेशी यांच्यासह तांत्रिक कामगार चालक वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वासुदेव आव्हाड यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.





