नेवासा : 9 महिन्यांच्या आराध्याला दुर्धर आजार, 16 कोटींच्या इंजेक्शनची गरज, कुटुंबाकडून मदतीची याचना

नेवासा (नगर) – पिचडगांव येथील रहिवासी देविदास रतन शिंदे यांची नऊ महिन्याची मुलगी आराध्याला दुर्धर आजाराचे निदान झाले आहे. तीला या दुर्धर आजारातून बरे करण्यासाठी तब्बल 16 कोटी रुपयांचे इंजेक्शनाची आवश्यकता आहे. एवढा मोठा खर्च केवळ शासन करू शकते त्यामुळे पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनीच पुढाकार घेऊन मुलीचे प्राण वाचवावेत अशी आर्त साद आराध्याच्या पालकांनी घातली आहे.
आराध्याला मस्क्युलर अट्रोफी (एसएमए) हा आजार जडला आहे. हा आजार जन्मानंतर सात महीन्यांनी कुटुंबियांच्या निदर्शनास आला. त्यामुळे सर्व कुटूंबच हातबल झालेले असून आमची चिमुकली कशी बरी होईल या विवंचनेत संपुर्ण कुटूंब मानसिक तणावात आहे. या चिमुकलीला आजारातून बरे करण्यासाठी एका इंजेक्शनची किंमत चक्क 16 कोटी रुपये असल्यामुळे कुटूंबिय हतबल झाले आहे. या गोंडस चिमुकलीला आजारातून बरे करण्यासाठी समाजातील दानशुर मंडळींसह सेवाभावी संस्था व सरकारी पातळीवर मदतीचा हात आराध्याच्या आई – वडीलांनी मागितला आहे. पण उपचाराची रक्कम चक्क 16 कोटी रुपयांची आसल्यामुळे ही रक्कम कशी जमा होईल या कोड्यात शिंदे कुटूंबिय अडकले आहेत.
सदर मुलीचे वडील देविदास रतन शिंदे हे अल्प भूधारक शेतकरी असून ते अल्पशिक्षित आहेत. त्यांचे नेवासा फाटा येथे छोटेखाणी ट्रॅक्टर गॅरेज असल्याने त्यावरच त्यांची गुजरान सुरू आहे. अर्थिक परिस्थिती कसेबसे समाधानाने खाता येण्यासारखी आहे. त्यांना एक मुलगा असून सदरची आराध्या ही त्यांचे दुसरे अपत्य आहे. जन्मानंतर सहाव्या महिन्यात आराध्याचे विविध हालचाली होत नसल्याचे पाहून त्यांनी दवाखाना गाठला. नगर, नाशिक व शेवट मुंबई येथे उपचारासाठी गेल्यानंतर सात महिन्यांच्या आराध्याला स्पायनल मस्क्युलर अट्रोफी (एसएमए) या दुर्धर नावाच्या आजाराने ग्रासलेले स्पष्ट झाले.
या आजाराचे उपचारासाठी एकमेव उपाय म्हणजे 16 कोटी रुपयांचे अमेरिकेतील इंजेक्शन आहे हे समजल्यावर कुटुंबीय चिंतेत पडले. अखेर त्यांनी आमदार शंकरराव गडाख, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार हेमंत गोडसे, केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार यांची भेट घेतली. या सर्वांनी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले व त्यानुसार कागदपत्रे देखील मागवली आहेत.
शिंदे कुटुंबीयांच्या या सर्व प्रयत्नांना यश यावे यासाठी सर्वजण प्रार्थना करीत आहेत. परंतु सदरचे इंजेक्शन येईपर्यंत महिन्याला सहा लाख रुपयांचे उपचार करावे लागणार आहेत. त्यासाठी देखील ते आर्थिक विवंचनेत आहेत. सद्यपरिस्थितीनुसार सदर खर्च शिंदे कुटूंबियांना पेलावणारा नसल्यामुळे आता आराध्याचे प्राण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात असून त्यांनी जर पुढाकार घेतला तरच आराध्याला जीवदान मिळू शकते व यासाठी आम्ही आयुष्यभर सर्वांचे ऋणी राहू, अशी भावना चिमुकलीच्याआई-वडिलांनी व्यक्त केली आहे.
माझ्या चिमुकल्या आराध्याला स्पायनल मस्क्युलर अट्रोफी (SMA) हा दुर्धर आजार झालेला आहे. उपचारासाठी 16 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी या आजारातून बरे करण्यासाठी मदत करा…तुमचा 1-1 रुपया माझ्या आराध्याला मरणाच्या दारातून परत बोलावण्यासाठी मदतीचा ठरेल.. मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहील, असे आवाहनही शिंदे कुटूंबियांनी केले आहे.
मदत पाठविण्यासाठी आराध्याच्या कुटुंबियांनी आवाहन केले असून अकाउंट डिटेल्स दिलेल्या आहेत. फोन पे/गूगल पे – 9960723029 / बँक खाते नंबर – SBI BANK- 32929224816
IFSC no- SBIN0015463
आराध्या देविदास शिंदे
(रा. पिचडगाव, ता.नेवासा, जि.अहमदनगर)
मुकिंदपूर-दहिगाव रोड सिमेंट पाईप कंपनी शेजारी
मो.नं. 9881661563 /9960723029





