इस्रायली पंतप्रधानांनी खामेनींना म्हटले ‘आधुनिक हिटलर’ ; इराणच्या सर्व अणुस्थाळांना नष्ट करण्याची दिली धमकी

Netanyahu on Khamenei। इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी, इस्रायल इराणमधील सर्व अणुस्थळांवर हल्ला करू करणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी, इराणच्या अणुस्थळांना लक्ष्य करण्यासाठी ते आंतरराष्ट्रीय समर्थनाचे स्वागत करतात. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करून बेंजामिन नेतान्याहू यांनी, ट्रम्प अमेरिकेसाठी जे चांगले आहे ते करतील आणि मी इस्रायलसाठी जे चांगले आहे ते करेन” असे त्यांनी म्हटले. तसेच इस्रायल इराणशी युद्ध करून जगाचा चेहरामोहरा बदलत असल्याचे नेतन्याहू यांनी निवेदनात म्हटले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दावा केला की त्यांनी इराणचे अर्ध्याहून अधिक क्षेपणास्त्र प्रक्षेपक नष्ट केले आहेत. नेतन्याहू यांनी सोरोका मेडिकल सेंटरला भेट दिली. त्यादरम्यान त्यांनी सांगितले की, इस्रायलच्या हल्ल्यातून कोणीही वाचू शकत नाही. त्यांनी असे संकेत दिले की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी देखील इस्रायलचे संभाव्य लक्ष्य असू शकतात. Netanyahu on Khamenei।
दरम्यान, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनीही खामेनींना आधुनिक हिटलर म्हटले आणि त्यांचे अस्तित्व नष्ट करण्याबद्दल संकेत दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की इराणमधील ही हुकूमशाही राजवट आता मानवतेसाठी धोका बनली आहे.
इराणी हल्ले आणि इस्रायली प्रतिक्रिया Netanyahu on Khamenei।
इराणने तेल अवीव आणि दक्षिण इस्रायलच्या भागात क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला, ज्यामध्ये शेकडो लोक जखमी झाले. इराणने रुग्णालये, निवासी घरे आणि सार्वजनिक ठिकाणांसह इस्रायली नागरी लक्ष्यांना लक्ष्य केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने इराणच्या अणु तळांवर हवाई हल्ले केले. वॉशिंग्टनस्थित एका मानवाधिकार गटाच्या मते, या हल्ल्यांमध्ये ६३९ लोक मारले गेले, त्यापैकी २६३ नागरिक होते. दुसरीकडे, इस्रायलमध्येही २४ लोक मृत्युमुखी पडले आणि शेकडो जखमी झाले. यापूर्वी, इस्रायलने इराणच्या अणु आणि लष्करी तळांवर हल्ला केला होता आणि त्यांचे अनेक वरिष्ठ कमांडर आणि शास्त्रज्ञ मारले होते.
हेही वाचा
Pune District : डिंभे धरण क्षेत्रात कमी पावसामुळे पाणी पातळीत संथ गतीने वाढ





