Netanyahu Iran plan: नेतान्याहूंचा इराणवर हल्ल्याचा प्लॅन लीक ; अमेरिकेने ऐनवेळी रोखली गुप्त कारवाई
Netanyahu Iran plan: इस्रायलमध्ये २७ ऑक्टोबर रोजी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.

Netanyahu Iran plan: इस्रायलमध्ये नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. आता एका अहवालातून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. ज्यामध्ये,”पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू निवडणुकीच्या केवळ एक दिवस आधी इराणवर एका मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते, परंतु अमेरिकेने त्यांना तसे करण्यापासून रोखले” असे सांगण्यात आले आहे.
इस्रायलच्या स्थानिक वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशन च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये, नेतान्याहू आणि त्यांचे निष्ठावान मोसाद प्रमुख, रोमन गॉफमन, यांनी इराणविरुद्ध एका गुप्त लष्करी कारवाईची संपूर्ण योजना आखली होती. मात्र, एका चुकीमुळे अमेरिकेला या योजनेची माहिती मिळाली आणि वॉशिंग्टनने तात्काळ हस्तक्षेप करून संपूर्ण कारवाई थांबवली” असे म्हटले गेले आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी या गुप्त कारवाईला विरोध केला होता Netanyahu Iran plan:
अहवालानुसार, या गुप्त कारवाईला इस्रायलच्या सर्वोच्च सुरक्षा यंत्रणा आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा पाठिंबा नव्हता. सुरक्षा अधिकाऱ्यांना भीती होती की निवडणुकीच्या तोंडावर असे पाऊल उचलल्यास इराणसोबत मोठे युद्ध सुरू होऊ शकते. शिवाय, देशातील परिस्थिती इतकी बिघडू शकली असती की वेळेवर निवडणुका घेणे अशक्य झाले असते.
या चिंता आणि सुरक्षा यंत्रणांच्या विरोधानंतरही, पंतप्रधान नेतान्याहू आणि मोसाद प्रमुखांनी ही मोहीम पुढे रेटली. मात्र, एका इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्याच्या तांत्रिक बिघाडामुळे अमेरिकेला या योजनेची माहिती मिळाली, ज्यामुळे अमेरिकेला तात्काळ ही मोहीम रद्द करावी लागली.
इस्रायली नेटवर्कने म्हटले आहे की ते कडक लष्करी सेन्सॉरशिप नियमांनुसार ही माहिती प्रसारित करत होते. मात्र, इस्रायली पंतप्रधानांच्या कार्यालयाने हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “इस्रायली निवडणुकांच्या अगदी आधी कोणताही हल्ला करण्याचा अजेंडा कधीच नव्हता, हे खुद्द पंतप्रधानांनी ऐनवेळी अगदी स्पष्ट केले होते.”
लष्करप्रमुख आणि पंतप्रधान यांच्यातील संघर्ष Netanyahu Iran plan:
२७ ऑक्टोबरच्या निवडणुकांच्या केवळ दोन दिवस आधी, २५ ऑक्टोबर रोजी चॅनल १२ ने केलेल्या आणखी एका खुलास्यानंतर हा अहवाल आला आहे. तेव्हाच्या वृत्तांनुसार, लष्करी कारवाईवरून पंतप्रधान नेतान्याहू आणि इस्रायली संरक्षण दलाचे (आयडीएफ) चीफ ऑफ स्टाफ आयल झमीर यांच्यात मतभेद असल्याचे सूचित केले होते. झमीर यांनी लष्करी आदेश लागू करण्यास सातत्याने विरोध केला होता, कारण संरक्षण अधिकाऱ्यांच्या मते यामुळे इराणसोबत थेट युद्ध होऊ शकले असते.
लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झमीर यांनी पुढील चर्चेसाठी आणि कारवाईला कायदेशीर मंजुरी मिळवण्यासाठी नेतान्याहू यांच्याकडे एका लेखी दस्तऐवजाची मागणी केली होती. पाल्माचिम हवाई तळावर झालेल्या बैठकीदरम्यान, दोघांमधील तणाव इतका वाढला की खोलीतील वातावरण तणावपूर्ण बनले.
त्यानंतर एका वरिष्ठ सुरक्षा सूत्राने सांगितले, “अलीकडच्या काळात झमीर यांनी बजावलेली भूमिका इतिहास कधीही विसरणार नाही.” मात्र, नेतान्याहू यांनी हे वृत्त “निरर्थक” ठरवून फेटाळून लावले आणि आपला झमीर यांच्याशी कोणताही वाद झाला नसल्याचे स्पष्ट केले.






