जान्हवी कपूर बनवणार ‘नेपोटिझम’ चित्रपट, कपूर कुटुंबातील सर्व स्टार्स करणार काम

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘गुडलक जेरी’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. यासोबतच जान्हवी सध्या ‘बावल’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जान्हवी ही इंडस्ट्रीतील अपकमिंग अभिनेत्री असून ती स्टार किड असली तरी तिने मेहनतीमुळे इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, जान्हवी कपूरने तिची इच्छा व्यक्त केली असून तिला तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत एक चित्रपट करायचा आहे.
जान्हवी कपूरने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ती बऱ्याच दिवसांपासून कुटुंबासोबत वेळ घालवू शकत नाही. बोनी कपूरपासून ते खुशी कपूर आणि अर्जुन कपूरपर्यंत सर्वजण आपापल्या कामात व्यस्त आहेत. जान्हवीही तिच्या आगामी ‘गुडलक जेरी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
जान्हवी स्वतःच्या कामात व्यस्त असल्यामुळे बराच काळ कुटुंबासोबत वेळ घालवू शकत नाही. यामुळेच जान्हवी कपूरने मुलाखतीदरम्यान तिची इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली,’मला असे वाटते की आता माझ्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी आपल्याला एक चित्रपट करावा लागेल आणि त्यात सर्वांना कास्ट करावे लागेल.’
एवढेच नाही तर जान्हवीने या चित्रपटाच्या नावाबद्दल पुढे बोलताना असेही सांगितले की, कदाचित आम्ही त्या चित्रपटाचे नाव नेपोटिझम ठेवू. जान्हवीने पुढे सांगितले की, त्यात माझे कुटुंब असेल, त्यामुळे चित्रपटाचे नाव नेपोटिझम असावे.’ असेही तिने सांगितले.
‘गुड लक जेरी’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 29 जुलै रोजी प्रेक्षकांना OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहता येणार आहे. हा चित्रपट तमिळ चित्रपट ‘कोलमावू कोकिला’चा हिंदी रिमेक आहे. जान्हवी या चित्रपटात दीपक डोबरियाल, सुशांत सिंग आणि मीता वशिष्ठ यांच्यासोबत दिसणार आहे.





