‘नेपोकिड का दाईजान’; ‘सैय्यारा’चे कौतुक करताच करण जोहर ट्रोल, दिले सडेतोड उत्तर

Karan Johar | ‘सैय्यारा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री अनीत पड्डाच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. करणं जोहरने देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. मात्र तो पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. यावेळी मात्र करणने ट्रोलरला सडेतोड उत्तरही दिलं आहे.
करण जोहरने इन्स्टाग्रामवर ‘सैय्यारा’ सिनेमासाठी लांबलचक पोस्ट शेअर करत लिहिले की, “मला आठवत नाही मी शेवटचा कोणता सिनेमा पाहून इतका भावुक झालो. अश्रू येतच आहेत पण आनंदही आहे. सिल्व्हर स्क्रीनवर एक प्रेमकथा इतकी गाजत आहे याचा आनंद आहे. या सिनेमाने संपूर्ण देशाला प्रेमात पाडलं आहे.”
“यशराज फिल्म्सने लव्हस्टोरीचा काळ पुन्हा आणला आहे. मोहित सुरीने त्याच्या करिअरमधला सर्वोत्कृष्ट सिनेमा बनवला आहे. त्याच्या स्टोरीटेलिंग, क्राफ्ट आणि संगीताच्या जादुई वापरामुळे मी चकित झालो आहे. संगीत या सिनेमाचा फक्त गाभा नाही तर मेन कॅरेक्टर आहे. अहान पांडे…काय पदार्पण केलं आहेस. तू माझं हृदय तोडलंस पण फिल्ममेकर म्हणून माझ्यात नवी ऊर्जा संचारली. तुझे डोळे खूप बोलतात आणि तुझा पुढील प्रवास पाहण्यासाठी मी आणखी वाट बघू शकत नाही. तू कमाल आहेस. मूव्हीज मध्ये तुझं स्वागत,” असे करणने म्हंटले आहे. Karan Johar |
View this post on Instagram
तो पुढे लिहितो, “अनीत पड्डा, सुंदर मुली…किती प्रेमळ आणि कमाल आहेस. तुझी शांतता सर्व काही सांगते आणि तुझी क्षमता पाहून माझ्या डोळ्यात पाहणी आलं आहे. अहान आणि तू तुम्ही दोघंही मॅजिकल आहात. सैय्याराच्या टेक्निकल आणि म्युझिक टीमचेही अभिनंदन. हुशार एडिटिंग टीमचेही विशेष अभिनंदन. ”
करणच्या या पोस्टवर एकाने कमेंट करत लिहिले, ‘आ गया नेपोकिड का दाईजान’. ट्रोलरच्या या कमेंटवर करणनेही उत्तर दिले आहे. ‘चुप कर! घरी बसल्या बसल्या नकारात्मकता पसरवू नको. दोन मुलांनी केलेलं काम पाहा आणि स्वत:ही थोडं काम कर.’ सध्या करणने दिलेलया या रिप्ल्याचा स्क्रीनशॉर्ट तुफान व्हायरल होत आहे. तसेच काहींनी त्याचे समर्थन देखील केले आहे. Karan Johar |
हेही वाचा:
‘जागा नाही’ म्हणताच एस.टी. कंडक्टरला बेदम मारहाण, शिरूर बसस्थानकातला धक्कादायक प्रकार





