महाराष्ट्रामध्ये आणखी एक बंड ! ‘या’ नेत्याने सोडली काकाची साथ

वर्धा : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये भाजपा नेते दत्ता मेघे यांचे पुतणे आणि येथील मेघे विद्यापीठाचे मुख्य कारभारी डॉ. उदय मेघे यांनी आज भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे मेघे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तसेच भाजपलासाठीदेखील हा मोठा धक्का मानला जात आहे.
मेघे कुटुंबात फूट पडली?
वर्ध्यात भाजपाचे अभ्युदय मेघे यांनी अखेर आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अभ्युदय मेघे हे भाजप नेते तथा माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे आहेत. मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते अभ्युदय यांचा पक्षप्रवेश पार पडला. यामुळे भाजपला वर्ध्यामध्ये मोठा धक्का बसला आहे.
विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातुन अभ्युदय मेघे यांचा जिल्ह्यात चांगला जनसंपर्क आहे. अभ्युदय मेघे वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष देखील आहेत. अभ्युदय मेघे यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. उदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने कुटुंबात फुट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.





