Nepal: अर्थमंत्र्यांना रस्त्यावर पळवून-पळवून मारहाण, संसद भवनात जाळपोळ… व्हिडीओ व्हायरल

काठमांडू : नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर बंदीविरोधात तरुणांचे आंदोलन हिंसक स्वरूप धारण करत आहे. या हिंसक निदर्शनांदरम्यान आंदोलकांनी अर्थमंत्री विष्णु पौडेल यांना रस्त्यावर पाठलाग करून मारहाण केली. दुसरीकडे याच दबावाखाली पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
वित्तमंत्र्यांवर हल्ला –
आंदोलनादरम्यान, Gen Z तरुणांनी वित्तमंत्री विष्णु पौडेल यांना रस्त्यावर पाठलाग करून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, सरकारविरोधातील जनतेचा रोष स्पष्ट दिसत आहे.
Amid escalating anti-government protests, Nepal’s Finance Minister was seen running on foot while being chased by angry demonstrators #PMOliResigns #NepalProtests #Kathmandu #NepalNews #SocialMediaBan #FreedomOfSpeech #CorruptionInNepal #NepalUnrest #DigitalFreedom… pic.twitter.com/IKyEPQA74U
— News18 (@CNNnews18) September 9, 2025
मंत्र्यांचे राजीनामे –
हिंसक आंदोलनाच्या दबावाखाली गृहमंत्री रमेश लेखक, कृषिमंत्री रामनाथ अधिकारी, आरोग्यमंत्री प्रदीप पौडेल आणि जलसंपदा मंत्री प्रदीप यादव यांनी राजीनामे दिले. अखेरीस पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनाही आपले पद सोडावे लागले.
संसद भवनात तोडफोड आणि जाळपोळ –
संतप्त आंदोलकांनी संसद भवनात घुसून तोडफोड आणि जाळपोळ केली. याशिवाय, माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आणि शेर बहादुर देउबा यांच्या घरांवरही हल्ले झाले. गृहमंत्री रमेश लेखक आणि संचारमंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या घरांना आग लावण्यात आली.
पोलिसांनी कठोर कारवाईचा प्रयत्न केला, परंतु परिस्थिती नियंत्रणात येत नाही. या हिंसाचारात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. नेपालमधील ही अस्थिर परिस्थिती देशाला गंभीर संकटाकडे घेऊन जात आहे. सरकार आणि आंदोलकांमधील तणाव कायम आहे.
#NepalProtest | नेपाल के वित्त मंत्री को प्रदर्शनकारियों ने पीटा #BreakingNews #NepalViolence #KPSharmaOli #Kathmandu #Nepal #India @journosaurav @NewsRaghav pic.twitter.com/inV3HxlifD
— India TV (@indiatvnews) September 9, 2025




