Nepal Plane Crash । नेपाळची राजधानी काठमांडू येथे आज सकाळी विमान कोसळले. विमान टेकऑफ घेताच विमान कोसळल्याची दुर्घटना घडलीय. यात विमानातील 19 पैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमी पायलट कॅप्टन मनीष शाक्य यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते. विमानाने सकाळी 11 वाजता त्रिभुवन विमानतळावरून उड्डाण केले, त्यानंतर काही वेळातच ते कोसळले. हे 9N-AME विमान सूर्या एअरलाइन्सचे होते. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी १७ सूर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते, तर उर्वरित २ क्रू मेंबर्स होते. अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की, बहुतांश विमान अपघातांचे कारण काय असू शकते ? बहुतेक विमान अपघात याच कारणामुळे होतात Nepal Plane Crash । युरोपियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी कौन्सिलने विमान अपघातांबाबत एक अहवाल तयार केला आहे. ज्यामध्ये 90 टक्के विमान अपघात तांत्रिक बिघाडांमुळे होतात असे म्हटले आहे. हा अहवाल 1996 चा आहे, ज्यामध्ये विमान अपघाताचे कारण तांत्रिक किंवा इंजिनमध्ये बिघाड असल्याचे सांगण्यात आले आहे. बहुतेक विमान अपघात का होतात? Nepal Plane Crash । 1983 ते 1999 दरम्यान, मोठ्या प्रमाणात विमान अपघाताच्या घटना नोंदवण्यात आल्या. ज्यावर यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डानेही संशोधन केले. या संशोधनात असे आढळून आले आहे की, विमान अपघातादरम्यान विमानातील प्रवाशांचे प्राण वाचण्याची 95 टक्के शक्यता असते. यापैकी जवळपास 55 टक्के विमान अपघाताच्या घटना सर्वात गंभीर आहेत. मात्र असे असतानाही प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. जगातील सर्वात मोठ्या विमान अपघाताच्या घटना जगातील सर्वात मोठी विमान दुर्घटना २५ मे १९७९ रोजी घडली होती. यावेळी अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट 191 मध्ये सुमारे 273 लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय दुसरा सर्वात मोठा विमान अपघात ३ जुलै १९८८ रोजी झाला होता. या घटनेत सुमारे 290 लोकांचा मृत्यू झाला.