नेपाळमध्ये भीषण अपघात ! ४० जणांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नदीत कोसळली; अनेक जण दगावल्याची भीती

Nepal Bus Accident । नेपाळमधून एका भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आलीय. 40 भारतीयांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेत अनेकांचा बळी गेल्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. दरम्यान, बचावकार्य सुरू आहे. नेपाळ पोलिस अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे.
नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 जणांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत पडली आहे. जिल्हा पोलीस कार्यालय तनहुणचे डीएसपी दीपकुमार राय यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की यूपी एफटी 7623 नंबर प्लेट असलेली बस नदीत पडली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बस पोखराहून काठमांडूला जात होती.
अनेक जण बेपत्ता, काहींची सुटका करण्यात यश Nepal Bus Accident ।
मुसळधार पावसामुळे नदीलाही पुरा आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बसमध्ये 40 जण होते, त्यापैकी काहींना वाचवण्यात यश आले आहे. मात्र अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. तानाहुन जिल्ह्यात हा अपघात झाल्याचे नेपाळ पोलिसांनी सांगितले आहे. बस उत्तर प्रदेशची आहे. मात्र बसमधून प्रवास करणारे लोक उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यातून नेपाळला गेले होते, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. उत्तर प्रदेशच्या रिलीफ कमिश्नरने याविषयी सांगितले की, नेपाळमधील घटनेच्या संदर्भात, बसमध्ये प्रवास करणारे लोक कोठून होते हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी संपर्क साधला जात आहे.” असेही म्हटले.
#WATCH | Nepal | An Indian passenger bus with 40 people onboard has plunged into the Marsyangdi river in Tanahun district, confirms Nepal Police.
“The bus bearing number plate UP FT 7623 plunged into the river and is lying on the bank of the river,” DSP Deepkumar Raya from the… pic.twitter.com/P8XwIA27qJ
— ANI (@ANI) August 23, 2024
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले Nepal Bus Accident ।
दरम्यान , स्थानिक पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक वृत्तानुसार बस नदीत पडण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असून मदतकार्याला प्राधान्य दिले आहे. प्रशासन आणि बचाव पथक या दुर्घटनेच्या सर्व परिस्थितीचा सखोल तपास करत असून पीडित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे.





