Nepal Avalanche: नेपाळमध्ये हिमस्खलन; सात ठार, अनेक बेपत्ता

Nepal Avalanche: नेपाळच्या ईशान्येकडील भागात सोमवारी झालेल्या भीषण हिमस्खलनात (Avalanche) किमान सात जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. 5,630 मीटर उंचीच्या यालंग री (Yalung Ri) शिखरावर ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या हिमस्खलनाने शिखराच्या बेस कॅम्पला (Base Camp) आपल्या विळख्यात घेतले. यावेळी बेस कॅम्पवर अनेक विदेशी गिर्यारोहक उपस्थित होते. या घटनेत परदेशी आणि नेपाळी नागरिकांचा समावेश असलेल्या सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मृतकांमध्ये परदेशी नागरिकांचा समावेश –
काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, मृतांमध्ये तीन अमेरिकन, एक कॅनेडियन, एक इटालियन आणि दोन नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. दोलखा जिल्हा पोलीस कार्यालयाचे उप-अधीक्षक ज्ञान कुमार महतो यांनी ही माहिती दिली.
या घटनेनंतरही चार जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांचा शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.


