ना सतेज पाटील, ना अमित देशमुख… काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव आघाडीवर? लवकरच होणार मोठा फेरबदल

Congress President of Maharashtra | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेसला अवघ्या 16 जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेतृत्व बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यातच, नाना पटोले यांनीही आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, नाना पटोले यांनी मंगळवारी दिल्लीवारीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर लवकरच राज्यात काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचे म्हटले होते.
नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळून 4 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचं नेतृत्व राज्यातून कोणाला मिळणार? याबाबत आता चर्चा सुरू झाली असून 4 चार नावे आता समोर आली आहे. यातील एक नाव मराठवाड्यातील, दुसरं नाव विदर्भातील आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. यात काँग्रेसचे निष्ठावान आणि आदिवासींसाठी काम करणारे नेते हर्षवर्धन सपकाळ यांचे नावं अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
कोणती चार नाव चर्चेत?
प्रदेशाध्यक्ष पदासाठी सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख यांची नावे आघाडीवर असतानाच हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव देखील पुढे आले आहे. या चार जणांमधूनच नवीन प्रदेशध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. मात्र, हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव अचानक समोर आल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे. ओबीसी नेते म्हणून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांच्या नावाची देखील प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होती. Congress President of Maharashtra |
हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत?
हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे निष्ठावान नेते आहेत. हर्षवर्धन सपकाळ हे 2014 ते 2019 या काळात बुलढाणा मतदारसंघाचे आमदार होते. तसेच ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. हर्षवर्धन सपकाळ हे राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विविध कार्यक्रमांमध्ये नेहमी सहभागी होत असतात. याशिवाय सपकाळ हे गांधी परिवाराचे जवळचे मानले जातात. काँग्रेसच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमात ते नेहमीच सक्रिय सहभागी राहिले आहेत. राज्यस्तरावर त्यांचे नाव फारसे चर्चेत नसले तरी संघटनेमध्ये ते एकनिष्ठतेने काम करत असतात. Congress President of Maharashtra |
हेही वाचा:





