नेहा कक्करने पतीसोबतचा रोमँटिक व्हिडिओ केला ‘शेअर’

Neha Kakkar । बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकताच तिने पती रोहनप्रीत सिंगसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ आणि फोटोमध्ये नेहासोबत रोहनप्रीतची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. यावेळी नेहाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या पतीसोबत रोमँटिक होतांना दिसत आहे.
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग एका परफेक्ट कपलसारखे दिसतात. दोघेही एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करण्यात अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. या व्हिडिओवर आता युजर्स प्रतिक्रिया देतांना दिसत आहे. नेहा कक्करने खाजगी व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
नेहा कक्करने तिचा पती रोहनप्रीत सिंगसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हे जोडपे क्रूझवर असून रोमँटिक मूडमध्ये असल्याचे दिसते. नेहा रोहनप्रीतच्या मांडीवर डोके ठेवून पडली आहे आणि रोहनप्रीत शॅम्पेन पीत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नेहाने लिहिले की, ‘माझी सुरक्षित जागा.’ यासोबतच नेहाने रोहनप्रीतलाही टॅग केले आहे.
या व्हिडिओच्या कमेंटमध्ये रोहनप्रीतने लिहिले आहे की, ‘मी नेहमीच तुमच्या पाठीशी उभा आहे.’ यासोबतच त्याने हार्ट इमोजीही तयार केला आहे. या व्हिडीओवर बहुतेक युजर्स त्याचे कौतुक करत आहेत. तर काही यावरून या जोडप्याला ट्रोल करत आहे. दरम्यान, नेहा आणि रोहनप्रीत यांचे २०२० मध्ये लग्न झाले होते आणि आजही ते एकत्र आहे.





