NEET पेपर लीकचा मास्टरमाईंड अटक, दोन MBBS विद्यार्थ्यांनाही CBI ने पकडले

नवी दिल्ली – सीबीआयने शनिवारी NEET-UG पेपर लीक प्रकरणात मास्टरमाईंड आणि दोन एमबीबीएस विद्यार्थ्यांना अटक केली. ज्यांनी कथितरित्या “सॉल्व्हर्स” म्हणून काम केले. सूत्रधार हा एनआयटी-जमशेदपूरचा बीटेकचा विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे.
वृत्तसंस्था पीटीआयने सीबीआय अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले आहे की, अटकेमुळे, एनईईटी यूजी परीक्षेतील कथित अनियमिततेशी संबंधित सहा प्रकरणांमध्ये एजन्सीने आतापर्यंत अटक केलेल्या लोकांची संख्या 21 वर पोहोचली आहे.
In the Patna NEET-UG paper leak case, the CBI arrested three persons, including two medical students of Bharatpur Medical College. The arrested medical students have been identified as Kumar Manglam Bishnoi and Deepender Kumar. The technical surveillance has confirmed their…
— ANI (@ANI) July 20, 2024
सॉल्व्हर हा भरतपुर मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी –
एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी अटक करण्यात आलेले दोन एमबीबीएस विद्यार्थी हे राजस्थानमधील भरतपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत. ज्यामध्ये द्वितीय वर्षाचा विद्यार्थी कुमार मंगलम बिश्नोई आणि प्रथम वर्षाचा विद्यार्थी दीपेंद्र शर्मा यांचा समावेश आहे. हे दोन्ही विद्यार्थी 5 मे रोजी NEET UG परीक्षेच्या तारखेला हजारीबागमध्ये उपस्थित होते.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही आरोपी कथितपणे पंकज कुमार या अभियंत्याने चोरलेल्या पेपरसाठी “सॉलव्हर्स” म्हणून काम करत होते, ज्याला आधीच अटक करण्यात आली आहे. अधिका-यांनी सांगितले की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जमशेदपूर येथून बीटेक (इलेक्ट्रिकल) पासआउट शशिकांत पासवान उर्फ शशी उर्फ पासू, कुमार आणि रॉकी यांच्याशी मिळून काम करत होता, ज्यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती.





