Neelkanth Jewellers: नीळकंठ ज्वेलर्सला प्रतिष्ठेचे ‘आयएजीईएस’ प्रमाणपत्र
Neelkanth Jewellers: या प्रसंगी एस. एस. धामणे अँड कंपनीचे भागीदार सीए शुभदा धामणे, सीए अभिषेक धामणे, सीए प्रसाद धामणे आदी उपस्थित होते.

Neelkanth Jewellers: पुण्यातील नामांकित नीळकंठ ज्वेलर्स यांना ‘इंडियन असोसिएशन फॉर गोल्ड एक्सलन्स अँड स्टँडर्ड्स’ (आयएजीईएस) या संस्थेकडून प्रमाणपत्र देऊन मंगळवारी सन्मानित करण्यात आले. आयएजीईएसचे उपाध्यक्ष नीरज रात्रा आणि संस्थापक दिलबागसिंग बीर, साहिबदयालसिंग बीर आणि सुरेंद्रपालसिंग बीर यांच्या हस्ते ज्वेलर्सचे संचालक यांना हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
आयएजीईएस म्हणजे काय?
भारतातील सोन्याच्या उद्योगासाठी कार्यरत आयएजीईएस ही स्वायत्त नियामक संस्था आहे. सोने शुद्धीकरण, बुलियन ट्रेडिंग, दर्जेदार उत्पादन व विक्री, विश्वासार्हता या सर्व बाबतींत उच्च दर्जाचे मानके सुनिश्चित करणे हे या संस्थेचे काम आहे. गुणवत्ता आणि पारदर्शकतेसाठी हे प्रमाणपत्र दिले जाते. ‘फेअर, ट्रान्सपरंट आणि रिस्पॉन्सिबल’ व्यवहाराचे प्रतीक म्हणून आयएजीईएस प्रमाणपत्राकडे पाहिले जाते.
या प्रसंगी एस. एस. धामणे अँड कंपनीचे भागीदार सीए शुभदा धामणे, सीए अभिषेक धामणे, सीए प्रसाद धामणे आदी उपस्थित होते.





