एनडीए सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता; ‘एक देश, एक निवडणूक’बाबत मोठी अपडेट समोर

One Nation One Election| भाजपच्या नेतृत्वाखालील असलेले राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार ‘वन नेशन, वन इलेक्शन’ लागू करून मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याला सर्व पक्षांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
एनडीए सरकार एक देश, एक देश निवडणूक लागू करण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत समाविष्ट सर्व राजकीय पक्ष आणि सत्तेतील घटक पक्ष या विधेयकाचे समर्थन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला 100 दिवस पूर्ण होत असताना ही माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टला केलेल्या भाषणात ‘एक देश एक निवडणूक’ लागू करण्यासंबंधी भाष्य केले होते. वारंवार होणाऱ्या निवडणुका देशाच्या प्रगतीच्या आड येत आहेत. ‘एक देश, एक निवडणूक’साठी देशाला पुढे यावे लागेल, असं पीएम मोदी आवाहन केले होते. तसेच एक देश, एक निवडणूक ही भाजपाच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील एक आश्वासन आहे. One Nation One Election|
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सुतोवाच
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “देशभरात सातत्याने सुरु असलेल्या निवडणुका या देशाच्या प्रगतीत अडथळा बनत आहेत. त्यामुळे देशाच्या विकासात अडचणी असल्याने आता संपूर्ण देशाने ‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, भारताच्या प्रगतीसाठी एक राष्ट्र, एक निवडणूक हे स्वप्न साकार करण्यासाठी मी राजकीय पक्षांना पुढे येण्याचे आवाहन करतो.” One Nation One Election|
“भारतातील स्रोतांचा वापर जास्तीत जास्त सामान्य लोकांसाठी करता यावं, त्याचा अपव्यय कमी व्हावा यासाठी देशात वन नेशन, वन इलेक्शन धोरणाची गरज आहे. एक देश, एक निवडणूक यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, ही केवळ राजकीय घोषणा नाही. हे देशासाठी महत्त्वाचे आहे,” असेही मोदींनी म्हटले होते.
दरम्यान, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने या वर्षी मार्चमध्ये पहिले पाऊल म्हणून लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस केली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या 100 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची शिफारसही समितीने केली आहे. 2029 पासून देशभरात एक देश एक निवडणूक संकल्पना राबवली जाण्याची शक्यता आहे. One Nation One Election|
‘एक देश, एक निवडणूक’ आणण्या मागचे कारण काय?
केवळ एकदाच नव्हे, तर इतर अनेक प्रसंगी पंतप्रधानांनी ‘एक देश, एक निवडणूक’ अशी उघड बाजू मांडली आहे. कोरोनाच्या काळात एका भाषणात पंतप्रधान म्हणाले होते की, एक देश एक निवडणूक ही भारताची गरज आहे, दर काही महिन्यांनी देशात कुठे ना कुठे निवडणुका होत आहेत. त्यामुळे विकासकामांवर मोठा परिणाम होत असून, लोकसभा-विधानसभा आणि पंचायत निवडणुकीत एकच मतदार यादी असावी, हे देखील आता आवश्यक आहे.
हेही वाचा:
मनोज जरांगे सहाव्यांदा उपोषण सुरू करणार; राज्य सरकारची होणार कोंडी ?





