Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसणार आहेत. अंतरवाली सराटी येथे सोमवारी रात्री १२ वाजेपासून त्यांचे उपोषण सुरू होणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या एक वर्षापासून आंदोलन करत आहेत. आतापर्यंत त्यांनी ५ वेळा आमरण उपोषण केलं आहे. परंतु मराठा समाजाला अद्याप ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालेलं नाही.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता राज्य सरकारने विशेष अधिवेशन देऊन स्वतंत्र आरक्षण दिले आहे. मात्र हे आरक्षण कोर्टात टिकणार नसल्याने सगेसोयरेंची अधिसूचना काढून मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. त्यांची ही मागणी सरकारने अद्याप मान्य केलेली नाही. Manoj Jarange |
सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, हैदराबाद गॅझेटसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावं, या मागण्या मनोज जरांगे यांनी केल्या आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात घोंगडी बैठका घेतल्यानंतर मनोज जरांगे हे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून सलग सहाव्यांदा उपोषण सुरू करणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते उपोषण करणार असल्याने शिंदे सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. Manoj Jarange |
संदिपान भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट
शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. पण या भेटीतील चर्चेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, मनोज जरांगे यांनी याआधी आपण 29 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, आता मनोज जरांगे हे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार आहेत.
हेही वाचा:
जम्मू-काश्मीरमध्ये कन्हैया कुमारचे मोठे आश्वासन ; सांगितले काँग्रेसचे सरकार आल्यास काय बदलणार?