“भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभ हा आमच्या शौर्याच प्रतिक आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारीला तिथे जाऊन आमच्या पूर्वजांना मानवंदना देत होते. तेंव्हा सुद्धा त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्याची कोणी हिम्मत केली नव्हती.होय आम्हीही तिथे जाणार आणि आमच्या पूर्वजांना मानवंदना देणार..!” असंही आव्हाड यांनी ट्विटद्वारे ठणकावून सांगितले आहे.
\nकाय आहे नेमकं प्रकरण
\nकरनी सेनेचे अजय सेंगर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भूमिका मांडली होती. इंग्रजांकडून लढलेल्या गद्दारांचा शौर्यदिन कसा काय साजरा होऊ शकतो ? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित करत शौर्य दिनावर बंदी घालण्याची मागणी करणार असल्याचे म्हंटले. या लढाईला जातीय लढाईचे स्वरूप देऊ नये अशी देखील मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सेंगर यावेळी म्हणाले होते. सेंगर यांच्या विधानांवरून आता नवा वाद सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.