Eknath Shinde : रूसू बाई रूसू….कवितेच्या माध्यमातून रोहिणी खडसे यांचा एकनाथ शिंदेना जोरदार टोला

जळगाव : येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळूनदेखील अद्याप सरकार स्थापन करता आलेले नाही. इतके बहुमत असताना सुद्धा जल्लोष दिसत नसल्याने विरोधांकडून जोरदार टीका केली जात आहे. संजय राऊत, नाना पटोले यांच्यानंतर आता शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी एका कवितेद्वारे मुख्यमंत्री शिंदे आणि महायुतीला जोरदार टोला लगावला आहे.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे ?
आज रोहिणी खडसे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्याचा खरपूस समाचार घेतला. दिल्ली दरबारी जाऊन आल्यापासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा होत आहे. खडसे यांनी एक्सवर याविषयीची एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी रुसू बाई रुसू या मथळ्याखाली शिंदे आणि महायुतीला चिमटे काढले आहेत.
रुसू बाई रुसू
रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू,
आमच्यासंगे बोला आता, ढिश्यू, ढिश्यू, ढिश्यू।
आहा… ही ही… हो हो,
आता तुमची गट्टी फू!लालबाल, बारा वर्षं, बोलू नका कोणी,
चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी।
महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला?
सांगशील का माझ्या कानी, राग तुझा कसला?…— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) December 3, 2024
रोहिणी खडसेंनी काय लिहिले पोस्टमध्ये?
रुसू बाई रुसू
रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू,
आमच्यासंगे बोला आता, ढिश्यू, ढिश्यू, ढिश्यू।
आहा… ही ही… हो हो,
आता तुमची गट्टी फू!
लालबाल, बारा वर्षं, बोलू नका कोणी,
चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी।
महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला?
सांगशील का माझ्या कानी, राग तुझा कसला?
गाल गोबरे, गोरे गोरे,
लबाड डोळे, दोन टपोरे।
आनंदी या चंद्रमुखाचा,
उदास का दिसला?
राग तुझा कसला?
महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला?
बावन पत्ते बांधू बाळा,
शर्यत खेळू, घोडा घोडा।
घरादाराला खेळवणारा,
का झाला हिरमुसला?
राग तुझा कसला?
महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला?
चिमणी खाई मोती-दाणे,
गोड कोकीळा गाई गाणे।
अल्लड, भोळा गवई माझा,
अबोल का बसला?
राग तुझा कसला?
महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला?
मुख्यमंत्री पदाबाबत सस्पेन्स कायम
महायुतीमधील संभ्रमावर रोहिणी खडसेंनी जोरदार टीका केली. पत्रिका छापून तयार आहेत. पण नवरदेव ठरला नसल्याचा टोला त्यांनी महायुतीला लगावला. अनेकजण अनेक अपेक्षा ठेवून निवडणुकीला सामोरं गेले होते. आता कुठं वादाला सुरुवात झाली आहे. भविष्यात हे वाद वाढतील. शपथविधी तोंडावर असतानाही त्यांचा मुख्यमंत्री ठरलेला नाही अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे.





