NCP News : राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांचा पत्ता कट; ‘या’ नेत्याला दिली राज्यसभेची उमेदवारी
आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आपल्या उमेदवाराची अधिकृत (NCP News) घोषणा केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भंडारा-गोंदियाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांना पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

NCP News : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आपल्या उमेदवाराची अधिकृत (NCP News) घोषणा केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भंडारा-गोंदियाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांना पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. मात्र, या उमेदवारीच्या घोषणेनंतर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या संभाव्य भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
राजेंद्र जैन यांच्या रूपाने विदर्भाला प्रतिनिधित्व
राजेंद्र जैन हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांनी यापूर्वी विधान (NCP News) परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे.
राजेंद्र जैन यांना राज्यसभेवर पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात पक्षाची पकड मजबूत करण्याचा आणि पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्याला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. जैन यांच्या उमेदवारीमुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
छगन भुजबळ यांच्या नावाच्या चर्चेला पूर्णविराम?
या राज्यसभा जागेसाठी गेल्या काही दिवसांपासून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर होते. भुजबळ हे स्वतः देखील राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
ओबीसी समाजाचा मोठा चेहरा असलेल्या भुजबळ यांना दिल्लीच्या राजकारणात पाठवून पक्ष राष्ट्रीय पातळीवर आपली ताकद वाढवेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, पक्षाने ऐनवेळी राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यामुळे भुजबळ यांच्या नावाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
भुजबळांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीनंतर आता छगन भुजबळ कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या इतर राजकीय घडामोडींवेळी देखील भुजबळ यांच्या नावाचा विचार न झाल्याने ते नाराज असल्याच्या वावड्या उठल्या होत्या.
आता पुन्हा एकदा त्यांना डावलून जैन यांना (NCP News) संधी देण्यात आल्याने, भुजबळ गट काय पवित्रा घेणार आणि यावर छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया काय असेल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समीकरणांच्या दृष्टीने राजेंद्र जैन यांची ही उमेदवारी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, आगामी काळात याचे महायुतीमधील अंतर्गत राजकारणावर काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






