रोहित पवारांच्या कामगिरीवर राष्ट्रवादी काॅंग्रेस खुश; शरद पवार यांनी सोपवली मोठी जबाबदारी

मुंबई – नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काॅंग्रेससाठी रोहित पवार यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. या निवडीनंतर रोहित पवार यांना मोठी जबाबदारी मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. अशातच आता रोहित पवार यांच्या खांद्यावर भूम-परांडा, उस्मानाबद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेनंतर प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी जबाबदारी सोपवली असल्याची माहिती रोहित पवार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
रोहित पवार यांचे ट्विट –
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आदरणीय पवार साहेब यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवलीय. पक्षादेशानुसार आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवे-जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला जाईल आणि या विश्वासाच्या बळावरच आगामी सर्व निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
आदरणीय @PawarSpeaks साहेब यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष @Jayant_R_Patil साहेब यांनी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवलीय. पक्षादेशानुसार आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 17, 2022
दरम्यान, पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील काही महानगरपालिकाच्या निवडणूका पार पडत आहेत. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणूका लागणार आहेत. विधानसभा निवडणूकीसाठी अद्याप वेळ असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. त्यासाठीच पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी रोहित पवार यांच्याकडे दिली आहे. रोहित पवार तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. कर्ज जामखेड मतदार संघामध्ये रोहित पवार यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळेच रोहित पवाल यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असल्याचा अंदाज आहे.





