पिंपरी चिंचवड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात भाजपच्या अधिवेशनात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. या सभेत शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरक्या असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला होता. त्यांच्या या टिकेवरून अजित पवारांच्या आमदाराने नाराजी व्यक्त केली आहे. ‘या’ आमदाराने व्यक्त केली नाराजी अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेल्या अण्णा बनसोडे यांनी अमित शहा यांनी केलेली टीका योग्य नसल्याचं म्हटलंय. भाजपने शरद पवार यांच्यावरील टीका थांबवावी असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. अजित पवार यांनी देखील काल पिंपरी चिंचवड मधील सभेत शरद पवार आपले दैवत असल्याचं सांगत, पवरांबद्दल आदरभाव व्यक्त केला होता. अजित पवारांची सावध प्रतिक्रिया शरद पवारांवरील अमित शाहांच्या टीकेबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. “अमित शाह नेमकं काय बोलले ते मला माहित नाही. मात्र मी नेमकी टीका काय केली ती पाहून प्रतिक्रिया देईन” असे अजित पवार म्हणाले आहेत.