NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचाच
NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. शरद पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर तसेच सुनील तटकरे यांच्या विधानानंतर या विषयावर राजकीय चर्चांना उधाण आले.

NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. शरद पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर तसेच सुनील तटकरे यांच्या विधानानंतर या विषयावर राजकीय चर्चांना उधाण आले. (NCP Merger)
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विलिनीकरणाबाबतचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे; मात्र एनडीएचा घटकपक्ष असल्याने ते आमच्याशी सल्लामसलत करतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (NCP Merger)
राष्ट्रवादीच्या निर्णयाबाबत फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एका बाजूला शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आहेत, तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारखे नेते आहेत. विलिनीकरणाबाबत कोणता निर्णय घ्यायचा, हे त्यांनीच ठरवायचे आहे. (NCP Merger)
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा एनडीएचा घटकपक्ष असल्याने त्यांच्या निर्णयाबाबत आमच्याशी सल्लामसलत केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. (NCP Merger)
“राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी अद्याप आमच्याशी याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही. त्यांच्यात चर्चा सुरू असेल, तर त्याची माहितीही आम्हाला देण्यात आलेली नाही. त्यांनी याबाबत आम्हाला सांगितल्यास आम्ही आमची भूमिका मांडू,” असे मुख्यमंत्री म्हणाले. (NCP Merger)
शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर चर्चांना वेग
शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात भेट घेतली होती. या भेटीदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये शरद पवार १० तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करण्याचा उल्लेख करताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. (NCP Merger)
या व्हिडीओनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. त्यातच सुनील तटकरे यांनीही अजित पवार हयात असते, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या, असे विधान केले होते. त्यांनी १२ फेब्रुवारी ही विलिनीकरणासाठी ठरलेली तारीख असल्याचाही उल्लेख केला होता. (NCP Merger)
राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया
या घडामोडींवर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या कामाच्या संदर्भात ११ तारखेनंतर भेट होणार असल्याचे म्हटले. शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी अशा भेटींमधून नवे संकेत मिळत असल्याची प्रतिक्रिया दिली. (NCP Merger)
दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत, असे मत व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादीतील काही नेत्यांबाबत त्यांनी टीकात्मक विधान केले. (NCP Merger)
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आगामी काळात या विषयावर दोन्ही गटांची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (NCP Merger)





