राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा उपाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता; अजित पवार ‘या’ नेत्याला देणार संधी

Maharashtra Politics | आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. यंदाचे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मात्र याचदरम्यान एक माहिती समोर येत आहे. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विधानसभेचे उपाध्यक्षपद येण्याची शक्यता आहे.
विधानसभेचे अध्यक्षपद आणि विधानपरिषदेचे अध्यक्षपद भाजपाकडे आहे. आता या अधिवेशनात सभागृहाला उपाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा उपाध्यक्षपदासाठी राजकुमार बडोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक समतोल साधण्यासाठी एससी प्रवर्गाला न्याय देण्यासाठी उपाध्यक्षपद देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता राजकुमार बडोले यांना उपाध्यक्षपद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. Maharashtra Politics |
विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव चर्चेत
तर दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाने दावा केला आहेत. त्यानुसार भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी इतर दोन पक्षांचा पाठिंबा लागणार आहे. ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे, सुनिल प्रभू यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. शिवाय विधानसभा विरोधी पक्षनेते पद ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळालं तर विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस पक्ष दावा करू शकतो. Maharashtra Politics |
जितेंद्र आव्हाडांची हातात बेड्या घालून एन्ट्री
अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याच्या तयारीत आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड विधान भवनात बेड्या घालून पोहचले.
“अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय, ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत, ती पद्धत चुकीची आहे. व्यक्त होणे हा आमचा संविधानिक अधिकार आहे. आम्हाला व्यक्त होत आलंच पाहिजे. राईट एक्सप्रेशन, राईट टू स्पीच हे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबूत राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत,”असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
हेही वाचा :
“उद्धव ठाकरेंचे सशर्त हिंदुत्व…” म्हणत संजय निरूपम यांचे ठाकरे गटाला सडेतोड उत्तर




