पिंपरी | राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीसपदी ॲड. पंजाब इंगळे

पिंपरी, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस पदी अॅड. पंजाब इंगळे यांची नियुक्ती झाली आहे. तसे नियुक्तीपत्र पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे यांच्या हस्ते ॲड. इंगळे यांना देण्यात आले. त्यावेळी लिगल सेलचे शहराध्यक्ष अॅड. संजय पाटील उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने ॲड. इंगळे यांची निवड करण्यात आली. पक्षाची विचारधारा व तत्वांना केंद्रस्थानी ठेवून पक्षाचा विस्तार आणि संघटन वाढविण्यासाठी ॲड. इंगळे यशस्वी वाटचाल करतील व त्यांच्या सक्षम कृतीतून जनसामान्यांच्या मनात पक्षाची प्रतिमा अधिक उज्वल करतील. असा विश्वास अॅड. संजय पाटील यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी ॲड. इंगळे यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याबाबत ॲड. इंगळे यांनी सांगितले की, पक्षाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, संघटनेच्या माध्यमातून सामान्य जनतेची आडचण दुर करण्यासाठी प्रयत्न करीन. अशी हवी त्यांनी दिली.





