मुंबई – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर टीका केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खासदार संजय राऊत यांनी सुद्धा ट्विट करत अजित पवारांचे कौतुक केले होते. करत असतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी एक ट्वीटही केलं आहे.
या व्हिडिओमध्ये अजित पवार यांनी टीका केली असून “नारायण राणेंनी शिवसेना फोडली तर सगळे पडले की नाही. नारायण राणे तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि दुसरीकडे वांद्र्यात का कुठे उभे होते. तिथेही पडले. तिथे तर महिलेने पाडलं…बाईनं पाडलं. ही त्यांची, प्रत्येकाची काय परिस्थिती आहे. ” असे म्हंटले आहे.
या व्हायरल व्हिडिओवर जेव्हा पत्रकरांनी नारायण राणे यांना विचारले असते, नारायण राणे यांच्या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या या इशाराच दिला की,’ अजित पवार यांना आव्हान देत माझ्या फंद्यात पडू नका. नाही तर मी पुण्यात, बारामतीत येऊन तुमचे बारा वाजवीन.’ आता त्यांचा या इशाराला विरोधी पक्षातील नेत्यांकडून प्रतिउत्तर देण्यात येत आहे.
प्रतिआव्हान पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी राणेंना दिले आहे. आपण बारामतीत येऊन अजित पवार यांचे बारा वाजून दाखवाच…’ असं म्हणत त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.