मुंबई – बँकांसमोर ठेवीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बँकांच्या कर्ज वितरणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशातच बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणजे एनबीएफसींचा कर्ज पुरवठा सप्टेंबर अखेरच्या दुसर्या तिमाहीत 13 टक्क्यांनी कमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याचा अर्थ अनौपचारिक क्षेत्रात भांडवलाचा वापर कमी केला जात असल्याचे दिसून येत आहे. भांडवलाचा वापर वाढावा आणि विकास दर वाढावा यासाठी अर्थ मंत्रालय आणि रिझर्व बँक प्रयत्न करीत असतानाच एनबीएफसीचा कर्ज पुरवठा कमी झाला असल्याची माहिती समोर आल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी दुसर्या तिमाहीत एनबीएफसीनी 8.9 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला होता. यावर्षी दुसर्या तिमाहीत ही रक्कम 13 टक्क्यांनी कमी होऊन 7.8 लाख कोटी रुपये झाली आहे. एनबीएफसीकडून शहरातील नागरिकांना होणार्या कर्ज पुरवठ्यात 23% घट झाली आहे. गेल्या वर्षी दुसर्या तिमाहीत एनबीएफसीनी शहरातील नागरिकांना 6 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला होता. यावर्षी दुसर्या तिमाहित ही रक्कम कमी होऊन 4.68 लाख कोटी रुपये झाली आहे. शहरातील नागरिकांचे पगार वाढत नाहीत. त्यामुळे या नागरिकाकडून ग्राहक उपयोगी वस्तूंवरील खर्च कमी झाला आहे असे बोलले जात असतानाच ही आकडेवारी समोर आली आहे. Rupee vs Dollar | रुपयाची घसरण थांबता थांबेना, सरलेल्या वर्षात तीन टक्क्यांनी झाले अवमूल्यन… शहरी भागातील कर्ज पुरवठा कमी झाला असतानाच निमशहरी आणि ग्रामीण भागातील कर्जपुरवठ्यावरील परिणाम तुलनेने कमी आहे. निमशहरी भागाला झालेला कर्जपुरवठा दुसर्या तिमाहीत 7.49 टक्क्यांनी वाढून 73 हजार कोटी रुपये झाला आहे. ग्रामीण भागातील कर्जपुरवठा 6.54 टक्क्यांनी वाढून दोन लाख कोटी रुपये इतका झाला आहे.