Nayanthara : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नयनताराची खास पोस्ट; पती विग्नेश आणि जुळ्या मुलांसोबतचे फोटो केले शेअर
Nayanthara : एका फोटोत नयनतारा आणि विग्नेश रोमँटिक पोज देताना दिसतात, तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही एकमेकांकडे पाहून हसताना दिसत आहेत.

Nayanthara : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विग्नेश शिवन यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास दिनाच्या निमित्ताने नयनताराने सोशल मीडियावर पती आणि जुळ्या मुलांसोबतचे काही सुंदर कौटुंबिक फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सध्या नयनतारा आपल्या कुटुंबासह व्हॅटिकन सिटीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याच ट्रिपमधील काही खास क्षण तिने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नयनतारा, विग्नेश आणि त्यांची जुळी मुले एकत्र आनंदी क्षण साजरे करताना दिसत आहेत.
काही फोटोंमध्ये नयनतारा आपल्या मुलांवर आणि पतीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसते, तर काही फोटोंमध्ये संपूर्ण कुटुंब व्हॅटिकन सिटीच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. एका फोटोत नयनतारा आणि विग्नेश रोमँटिक पोज देताना दिसतात, तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही एकमेकांकडे पाहून हसताना दिसत आहेत.
हे फोटो पोस्ट करत नयनताराने “Happy Anniversary to Us” असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने “Happy Happy” अशी प्रतिक्रिया दिली, तर अदिती राव हैदरीने “Happy Happiest” असे म्हणत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
नयनतारा आणि विग्नेश शिवन यांची प्रेमकहाणी 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नानूम रौडी धान’ या तमिळ चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये मैत्री वाढली आणि त्यानंतर त्यांचे नाते प्रेमात बदलले. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 9 जून 2022 रोजी महाबलीपुरम येथे त्यांनी विवाह केला.
या लग्नसोहळ्याला बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. लग्नानंतर काही महिन्यांतच, 22 सप्टेंबर 2022 रोजी सरोगसीद्वारे या जोडप्याला जुळे पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांच्या मुलांची नावे उयिर रुद्रनील एन. शिवन आणि उलगा दैविक एन. शिवन अशी आहेत.
दरम्यान, नयनतारा लवकरच अभिनेता यशच्या बहुचर्चित ‘टॉक्सिक’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी, हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
हेही वाचा : Kangana Ranaut: कंगना रणौतचा वादग्रस्त शो पुन्हा येतोय; ‘लॉक अप २’ची तारीख जाहीर





