Nayantara : साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे नयनतारा. तिने साऊथच्या अनेक मोठ्या कलाकारांबरोबर स्क्रिन शेअर केली आहे. नुकताच अभिनेत्रीने तिचा ४१ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या निमित्ताने नयनतारा हिच्या पत्नीने तिला अत्यंत महागडे गिफ्ट दिले आहे. त्यामुळे यंदाचा वाढदिवस अभिनेत्रीसाठी खूपच खास ठरला आहे. अभिनेत्री नयनताराला तिचा पती आणि दिग्दर्शक विग्नेश शिवनने वाढदिवसादिवशी आलिशान महागडी कार भेट म्हणून दिली आहे. विग्नेशने दिलेली कार अत्यंत महागडी असून रॅाल्स रॅायस या जगप्रसिद्ध कंपनीची आहे. नुकतेच विग्नेनशने सोशल मीडियावर नव्या कारचे फोटो शेअर केले आहेत. या कारमध्ये अभिनेत्री नयनतारा आणि त्यांची मुलंदेखील दिसत आहे. या फोटोंवर नेटकरी आणि चाहत्यांनी अभिनंदन आणि शुभेच्छांच्या वर्षाव केला आहे. या आलिशान कारची किंमत तब्बल १० कोटी रुपये आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी एवढी महागडी कार भेट म्हणून दिल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश दोघेही २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यमान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखी असल्याची चर्चा सातत्याने होत असते. नयनताराला इतके महागडी आलिशान कार दिल्याने तिचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. ती आगामी अनेक मोठ्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तिचे अनेक मोठे प्रोजेक्ट अॅानफ्लोअर आहेत. 2023 मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटात नयनताराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिच्या अॅक्शन अवताराने सगळ्यांच थक्क केले. हेही वाचा : अमोल कोल्हेंचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; ‘अरुंधती’सोबत झळकणार मुख्यभूमिकेत