आंध्र प्रदेशात मोठी कारवाई ! मारेदुमिल्ली जंगलात ७ नक्षलवादी ठार ; तांत्रिक तज्ज्ञ ‘शंकर’चाही समावेश

Naxalites killed। आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील मारेदुमिल्ली जंगल परिसरात बुधवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या तीव्र चकमकीत ७ नक्षलवादी ठार झाले. यात तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. राज्य गुप्तचर विभागाचे एडीजी (लॉ अँड ऑर्डर) महेश चंद्र लड्ढा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही कारवाई मंगळवारी सकाळी सुरू झाली होती आणि बुधवारीही परिसरात स्पॉट चकमक झाली.
ठार झालेल्यांमध्ये आंध्र-ओडिशा सीमा (AOB) झोनचा महत्त्वाचा तांत्रिक तज्ज्ञ मेतुरी जोगाराव ऊर्फ शंकर (श्रीकाकुलम) याचाही समावेश असल्याची प्राथमिक ओळख पटली आहे. शंकर हा AOB एरिया कमिटी मेंबर (ACM) होता आणि नक्षलवाद्यांचे शस्त्रास्त्र तयार करणे, संचार यंत्रणा हाताळणे व तांत्रिक नेटवर्क उभारण्यात तो माहिर मानला जात होता.मागील ४८ तासांत १३ नक्षलवादी ठार करण्यात आले आहेत.
एनटीआर, कृष्णा, काकीनाडा, डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा आणि एलुरू जिल्ह्यांतून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त नक्षलवादी अटक करण्यात आले आहेत. यात केंद्रीय कमिटी, राज्य कमिटी, एरिया कमिटी सदस्य आणि प्लॅटून लेव्हलचे कमांडर यांचा प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने समावेश आहे.
शंकर हा शस्त्रे तयार करण्यात, संप्रेषण प्रणाली चालवण्यात आणि तांत्रिक नेटवर्क्स चालवण्यात तज्ज्ञ होता. सुरक्षा एजन्सींच्या मते, एओबी झोनमध्ये नक्षलवाद्यांच्या तांत्रिक क्षमता बळकट करण्यासाठी हा कॅडर जबाबदार होता. गेल्या काही महिन्यांपासून आंध्र-ओडिशा प्रदेशात माओवादी कारवाया वाढत असताना ही चकमक घडली आहे. नक्षलवादी जंगलात नवीन तळ स्थापन करत आहेत आणि स्थानिक कॅडरना सक्रिय करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या आधारे, संयुक्त दलांनी मंगळवारी शोध मोहीम सुरू केली. Naxalites killed।





